गृह मंत्रालय
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची सायकल रॅली गोव्याहून रवाना
Posted On:
13 OCT 2021 11:49AM by PIB Mumbai
गोवा, 13 ऑक्टोबर 2021
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने आयोजित केलेल्या सायकल रॅलीला आज नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांच्या हस्ते झेंडा दाखवण्यात आला. सीआयएसएफने सरदार वल्लभाई पटेल यांच्या 146 व्या जयंतीनिमित्त या सायकल रॅलीचे आयोजन केले आहे.
मिलिंद नाईक यांनी सीआयएसएफचे रॅली आयोजनाबद्दल कौतुक केले. राष्ट्रीयत्वाची चेतना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सीआयएसएफने तिरुअनंतपूरम ते केवडिया या सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. ही सायकल रॅली गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून स्टॅच्यू ऑफ युनिटी, केवडिया गुजरात येथे 26 ऑक्टोबर रोजी पोहचेल. सायकल रॅलीत 16 जवान आणि त्यांच्यासोबत 25 जणांचा चमू आहे. गोव्याहून निघालेले सायकलपटू प्रवासाच्या पुढच्या टप्प्यात बेळगावी येथे पोहचतील. तिरुअनंतपूरम येथून निघालेली सायकल रॅली गोव्यात 11 ऑक्टोबर रोजी पोहचली होती.
सीआयएसएफ सायकल रॅलीप्रसंगी गोवा पोलिसांच्या बँडपथकाने सलामी दिली. याप्रसंगी सीआयएसएफचे डेप्युटी कमांडट गुरुप्रसाद राय, वाहतूक व्यवस्थापक हिमांशू शेखर यांची उपस्थिती होती.
***
S.Thakur/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1763525)
Visitor Counter : 147