कृषी मंत्रालय
भारतीय कृषी संशोधन केंद्र, गोवा यांच्याकडून स्वच्छता मोहिमेचे आयोजन
Posted On:
12 OCT 2021 6:02PM by PIB Mumbai
पणजी, 12 ऑक्टोबर 2021
भारतीय कृषी संशोधन केंद्र, गोवा यांच्याकडून आज सावईवेरे येथे कृषी शाखेतील विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसाठी कृषी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि त्यांना गांडूळखत निर्मितीविषयी माहिती देण्यासाठी विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. कचऱ्यापासून संपत्ती ही या कार्यक्रमाची संकल्पना होती.

संस्थेचे संचालक डॉ प्रवीण कुमार यांनी दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. त्यांनी अग्नी (कृषी व्यवसाय) या योजनेविषयी माहिती देत स्टार्टअपना पुढे येण्याचे आवाहन केले. आयसीएआरकडून स्टार्टअप्सना सुरुवातीला सहा महिन्यांसाठी मदत दिली जाते.
AGI6.JPG)
उत्तर गोवा कृषी विज्ञान केंद्राचे संचालक एचआरसी प्रभू यांनी विशेष स्वच्छता मोहिमेचे महत्त्व विशद केले. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना गांडूळखताच्या निर्मितीविषयी चित्रफितीच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. तसेच सहभागितांना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी साधनांचे वितरण करण्यात आले. सुनेत्रा तालोकीकर यांनी आभारप्रदर्शन केले. तर, राहुल कुलकर्णी, विश्वजीत प्रजापती यांनी कार्यक्रमाचे संकलन केले.

S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1763301)
Visitor Counter : 155