गृह मंत्रालय

राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त काढण्यात आलेली सायकल रॅली गोव्यात दाखल

Posted On: 11 OCT 2021 10:15PM by PIB Mumbai

गोवा, 11 ऑक्टोबर 2021

 

राष्ट्रीय एकता दिवस सोहळ्याचा भाग म्हणून तिरुअनंतपुरम ते केवडिया पर्यंत काढण्यात आलेली सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची 16 सायकलस्वरांचा समावेश असलेली सायकल रॅली 11 ऑक्टोबर 2021 रोजी गोव्यात दाखल झाली. भारतीय नौदलातील सायकलस्वरांचा गट या सायकल रॅलीतील सायकलस्वारांना दाबोलिम येथील नौदल हवाई संग्रहालयापर्यंत सोबत घेऊन गेला. तेथे गोवा क्षेत्राचे ध्वज अधिकारी कमांडिंग रिअर अॅडमिरल फिलिपोज जी पायनुमूटील यांनी सायकलस्वारांशी संवाद साधला आणि त्यांचा सत्कार केला. सायकल स्वारांना संग्रहालयाच्या आजूबाजूच्या परिसराला भेट देण्यासाठीही नेण्यात आले.

   

29 सप्टेंबर 2021 रोजी तिरुअनंतपुरम येथून सुरू झालेली ही सायकल रॅली कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातून प्रवास करत 26 ऑक्टोबर 2021 रोजी गुजरातमधील केवडिया येथे 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' येथे संपेल. 2100 किमी अंतराच्या परिसरातून जाणाऱ्या रॅलीमध्ये दक्षिण भागातून सीआयएसएफचे 15 जवान सहभागी होत आहेत. सहाय्यक कमांडंट अजयन टी, सीआयएसएफ युनिट, एमपीटी गोवा यावेळी उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो.

   

* * *

S.Tupe/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1763071) Visitor Counter : 110


Read this release in: English