PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 09 OCT 2021 6:31PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली/मुंबई, 9 ऑक्टोबर  2021

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

       #Unite2FightCorona                                               #IndiaFightsCorona

 

PRESS INFORMATION BUREAU

MINISTRY OF INFORMATION & BROADCASTING

GOVERNMENT OF INDIA

Image

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती

गेल्या 24 तासात 79,12,202 मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने भारत (93,99,15,323) 94 कोटी मात्रांच्या टप्प्या नजीक पोहचला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, 91,40,316 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

HCWs

1st Dose

1,03,74,846

2nd Dose

89,95,831

 

FLWs

1st Dose

1,83,57,931

2nd Dose

1,52,78,433

 

Age Group 18-44 years

1st Dose

37,98,90,830

2nd Dose

9,81,36,153

 

Age Group 45-59 years

1st Dose

16,43,35,949

2nd Dose

8,17,98,092

 

Over 60 years

1st Dose

10,38,78,387

2nd Dose

5,88,68,871

Total

93,99,15,323

 

गेल्या 24 तासांत 23,070 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 3,32,48,291 झाली आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 97.98% झाला आहे. मार्च 2020 पासूनचा हा सर्वोच्च दर आहे.

केंद्र आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 104 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.

गेल्या 24 तासात 19,740 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 2,36,643 असून देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 0.70% आहे. तसेच ही रुग्णसंख्या गेल्या 206 दिवसातील निचांकी आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 12,69,291 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 58.13 (58,13,12,481) कोटींहून अधिक चाचण्या घेतल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.62% असून गेल्या 106 दिवसांपासून हा दर 3% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.56% असून गेले सलग 40 दिवस हा दर 3 % पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 123 दिवस हा दर 5% पेक्षा कमी आहे.

 

इतर अपडेटस्

Important Tweets

 

***

R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1762544) Visitor Counter : 192