संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांना शौर्य आणि गुणवत्तापूर्ण सेवा पदके प्रदान
हिंद महासागर प्रदेशात सागरी शांतता, सुरक्षा राखण्यासह शोध आणि बचावकार्यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या योगदानाची केली प्रशंसा
Posted On:
09 OCT 2021 4:37PM by PIB Mumbai
ठळक मुद्दे:
- 21 पुरस्कार - तीन राष्ट्रपती तटरक्षक पदके (उल्लेखनीय सेवा), आठ तटरक्षक पदके (शौर्य) आणि 10 तटरक्षक पदके (गुणवत्तापूर्ण सेवा) प्रदान
- जगातील सर्वात मोठ्या सर्वोत्तम सागरी दलांपैकी एक म्हणून भारतीय तटरक्षक दलाची ओळख
- सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध
- संरक्षण मंत्र्यांनी 38 व्या तटरक्षक कमांडर परिषदेलाही केले संबोधित
संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांनी 09 ऑक्टोबर 2021 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित एका औपचारिक समारंभात भारतीय तटरक्षक दलाच्या (आयसीजी)जवानांना शौर्य आणि गुणवत्तापूर्ण सेवा पदके प्रदान केली.या समारंभादरम्यान तीन राष्ट्रपती तटरक्षक पदके (उल्लेखनीय सेवा), आठ तटरक्षक पदके (शौर्य) आणि 10 तटरक्षक पदके (गुणवत्तापूर्ण सेवा) यासह एकूण 21 पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांची अत्यंत निस्वार्थी समर्पित वृत्ती, अनुकरणीय साहस आणि अत्यंत कठीण परिस्थितीत दाखवलेले शौर्य याचा गौरव म्हणून ही पदके प्रदान करून या जवानांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी, पदक प्राप्त जवानांना शुभेच्छा दिल्या तसेच हे पुरस्कार आणि पदके ही विजेत्यांचे मनोबल तर वाढवतीलच, मात्र देशहिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने सर्वोत्तम कार्य करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या अन्य जवानांना प्रेरणा देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी सागरी सीमांचे आणि देशाच्या विशाल किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. तटरक्षक दलाच्या जवानांची ऊर्जा आणि त्यांच्या समर्पित वृत्तीचे कौतुक करत संरक्षण मंत्री म्हणाले की,केवळ 4-6 बोटींसह राष्ट्रसेवा सुरु करणारे भारतीय तटरक्षक दल आता 150 हून अधिक जहाजे आणि 66 विमानांसह जगातील सर्वोत्तम सागरी दलांपैकी एक आहे. या दलाची सातत्याने होत असलेली प्रगती ,राष्ट्रीय सागरी हित सुरक्षित देखरेखीखाली असल्याचा आत्मविश्वास लोकांमध्ये निर्माण करते.
भारताची संस्कृती, साहित्य, व्यापार आणि अर्थव्यवस्था यांचा समुद्राशी जवळचा संबंध आहे यावर भर देत संभाव्य समृद्धीसह ,समुद्रानेही विविध सुरक्षा आव्हाने उभी केली आहेत याकडे राजनाथ सिंह यांनी लक्ष वेधले. देशाच्या सागरी सुरक्षेला बळकट करण्याचा सरकारचा संकल्प, हा सर्वसमावेशक अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा रचनेचा एक महत्त्वाचा पैलू आहे. '' भारताचे सागरी क्षेत्र निर्धोक, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त असले पाहिजे'' यावर त्यांनाही भर दिला. यामुळे आपल्या सुरक्षेच्या अनुषंगाने असलेल्या गरजा पूर्ण होतील आणि पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक विकास सुनिश्चित होईल, ”असे ते म्हणाले.
वेगवान विकासाच्या मार्गावरून पुढे घोडदौड करण्यासाठी 'अबाधित सागरी कार्यान्वयन ' आवश्यक असल्याचे ते म्हणाले . भारत एक वाढते सागरी सामर्थ्य असून त्याची समृद्धी मुख्यत्वे समुद्रावर अवलंबून आहे., असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सागर' म्हणजेच 'प्रदेशातील सर्वांची सुरक्षा आणि विकास ' या दृष्टिकोनाचा संदर्भ देत त्यांनी भारतीय तटरक्षक दल प्रादेशिक सहकार्याला प्रोत्साहन देऊन, हिंद महासागर प्रदेशात सागरी शांतता राखण्यासाठी आणि कार्य करत उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आघाडीवर असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. सागरी सुरक्षेचे उद्दिष्ट साध्य करण्यात आघाडीवर असलेल्या आणि त्यादृष्टीने आंतरराष्ट्रीय सागरी संस्थांशी समन्वय साधल्याबद्दल त्यांनी भारतीय तटरक्षक दलाचे कौतुक केले.
***
R.Aghor/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1762441)
Visitor Counter : 288