आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्याकडील कोविड-19 लसीच्या मात्रांच्या उपलब्धतेविषयीची अद्ययावत माहिती
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या 88 कोटी 14 लाखांहून अधिक मात्रा पुरविण्यात आल्या
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे तसेच खासगी रुग्णालयांकडे 5 कोटी 28 लाखांहून अधिक मात्रा अजूनही शिल्लक
Posted On:
02 OCT 2021 9:56AM by PIB Mumbai
संपूर्ण देशात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा वेग वाढविणे आणि मोहिमेच्या व्याप्तीचा विस्तार करणे यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. या लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाचा नवा टप्पा देशात 21 जून 2021 पासून सुरु झाला. लसीच्या अधिक मात्रा उपलब्ध करून देणे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाचे उत्तम नियोजन करता यावे यासाठी त्यांच्याकरिता उपलब्ध असलेल्या लसीच्या मात्रांची आगाऊ स्वरुपात माहिती पुरविणे आणि लस पुरवठा साखळीचे सुरळीत मार्गीकरण करणे या उपक्रमांच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यात येत आहे.
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून भारत सरकार, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीचा मोफत पुरवठा करून त्यांना मदत करीत आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाच्या या नव्या टप्प्यात केंद्र सरकार, देशातील लस निर्मात्यांनी उत्पादित केलेल्या लसीच्या साठ्यापैकी 75% साठ्याची खरेदी करून त्याचा (मोफत) पुरवठा सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना करणार आहे.
VACCINE DOSES
|
(As on 2ndOctober 2021)
|
SUPPLIED
|
88,14,50,515
|
BALANCE AVAILABLE
|
5,28,28,050
|
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत भारत सरकारतर्फे खरेदी केलेल्या (मोफत पुरवठा मार्गाने) आणि थेट राज्यांकडून खरेदी अशा एकूण 88 कोटी 14 लाखांहून अधिक (88,14,50,515) मात्रांचा पुरवठा झाला आहे .
राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांकडे कोविड प्रतिबंधक लसीच्या 5 कोटी 28 लाखांहून अधिक (5,28,28,050) मात्रा अजूनही शिल्लक असून यापुढील काळातील लसीकरणासाठी त्या उपलब्ध आहेत.
***
S.Tupe/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1760408)
Visitor Counter : 218