कृषी मंत्रालय
केंद्रीय मंत्री शोभा करंदळाजे यांनी गोवा येथे राज्य आणि केंद्रीय योजनांच्या प्रगतीसंदर्भात घेतली आढावा बैठक
केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते शेतकरी दर्शना पेडणेकर यांचा सत्कार
Posted On:
30 SEP 2021 6:25PM by PIB Mumbai
पणजी, 30 सप्टेंबर 2021
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदळाजे यांनी गोव्यात विविध केंद्रीय क्षेत्र योजना आणि केंद्र पुरस्कृत योजनांबाबत आढावा बैठक घेतली.


आढावा बैठकीतील मुद्दे पुढीलप्रमाणे –
- गोवा राज्यात एकूण लागवडक्षेत्र 144381 हेक्टर आहे आणि ऐंशी टक्के शेतकरी हे छोटे आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत. गोवा राज्यातील शेतीसाठी केंद्रित मुद्दे म्हणजे पीएमकिसान सन्मान योजना, किसान क्रेडिट कार्ड, शेतकरी उत्पादक संस्था आणि कृषीपायाभूत सुविधा निधी.
- पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत भाड्याच्या शेतजमिनीवर शेती करणाऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले.
- व्याज सवलत आणि आर्थिक सहाय्याद्वारे पीक कापणी व्यवस्थापनसंबंधी पायाभूत सुविधा आणि सामुदायिक शेती मालमत्तेसाठी व्यवहार्य प्रकल्पांमध्ये गुंतवणूकीसाठी दीर्घकालीन कर्जपुरवठा सुविधा पुरवणाऱ्या कृषी पायाभूत निधीचा गोवा राज्यात अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करून घेण्यात यावा. केवळ शेतकरी उत्पादक संस्थाच नव्हे तर इतर व्यक्तीदेखील कृषी पायाभूत निधीअंतर्गत लाभ घेऊ शकतात आणि गोव्याने या निधीचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे.
- पीक उत्पादनाशी संबंधित अद्ययावत माहिती प्रदान करणे, महत्वपूर्ण कृषी संबंधित माहिती पुरवणे, प्राथमिक मृदा आणि बियाणे चाचणी सुविधा आणि सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राशी संवाद आयोजित करण्याच्या उद्देशाने गोवा डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो अशी सूचना त्यांनी केली.
- पीक सर्वेक्षणासाठी डिजिटल पद्धती लवकरच अंमलात आणली जाईल. पूर,दुष्काळ यांसारख्या आपत्तीदरम्यान शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी तंत्रज्ञान आता विकसित केले आहे आणि शेतकरी स्वतःशेताचे / नुकसानीचे फोटो काढू शकतात, आणि अॅपवर अपलोड करू शकतात. कर्नाटक आणि गुजरातमधील शेतकऱ्यांनी या डिजिटल पद्धतींचा वापर सुरु केल्याचे राज्यमंत्री म्हणाल्या. एकदा डेटा अपलोड झाल्यावर तज्ज्ञ पॅनेलचे सदस्य परिस्थितीचा त्वरीत आढावा घेऊ शकतात आणि आवश्यक कार्यवाही करू शकतात. 'स्वयंपूर्णमित्र' चा देखील पीक सर्वेक्षणासाठी वापर करता येईल असे त्यांनी सुचवले.
- शेतकऱ्यांना चांगले आणि दर्जेदार बियाणे मिळाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. गोवा राज्यात येणारी बियाणांची सर्व पॅकेट्स क्विकरिस्पॉन्स (क्यूआर) कोड प्रणाली वापरून पडताळून पाहिली पाहिजेत. बियाणांवर क्यूआरकोड आणि गुणवत्ता, परवाना क्रमांक, ठिकाण यासारखी बियाणांची संपूर्ण माहिती आहे याकडे आपण लक्ष देणे आवश्यक आहे.
- उसाची लागवड आणि गुळाचे उत्पादन वाढवता येईल कारण निर्यातीसाठी गुळाला मोठी मागणी आहे. उसाचे इथेनॉलमध्ये रूपांतर होऊ शकते आणि गेल्यावर्षी 9.5 टन उसाचे इथेनॉलमध्ये रूपांतर झाले, असे त्यांनी सांगितले.
- फळे आणि भाजीपाल्यांच्या एकात्मिक पुरवठा साखळीला राज्यमंत्र्यांनी प्रोत्साहन दिले, यासाठी मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर (MIDH) अंतर्गत निधीपेक्षा अधिक निधी पुरवला जाईल. पुरवठा साखळी प्रणाली देशातील सर्व राज्यांनी स्वीकारली पाहिजे आणि आत्मनिर्भर बनायला हवे.
- प्रत्येक राज्यात कृषी यंत्रणेची किंमत समान असावी. देशात वेगवेगळ्या ठिकाणी ते वेगवेगळे नसावे. केंद्र सरकारने डीलर्स आणि उत्पादकांना देशभरात एकसमान किंमत यादी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- दूध, भाजीपाला आणि चारा या तीन उत्पादनांमध्ये आपण पुढील तीन वर्षात स्वयंपूर्ण बनले पाहिजे, त्यानुसार आपण आत्मनिर्भर दिशेने प्रयत्न केले पाहिजेत. गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, गोवा सरकार आणि भारत सरकारमधील विविध कृषी संबंधित विभागांचे प्रमुख देखील बैठकीला उपस्थित होते.



गोव्यात शेतकरी कल्याण योजनांच्या उत्तम अंमलबजावणीसाठी गोवा सरकार, मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत आणि कृषिमंत्री चंद्रकांत कवळेकर उल्लेखनीय काम करत आहेत याबद्दल राज्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रसरकारने शेतकऱ्यांसाठी आखलेल्या लोकप्रिय योजनांबद्दल आभार मानले.


स्वयंपूर्ण गोवा आणि आत्मनिर्भर भारतच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली. स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत प्रत्येक शनिवारी आणि रविवारी देखील पंचायत स्तरावर बैठक आयोजित केली जाते, ज्यात सर्व सरकारी योजनांची माहिती दिली जाते, लाभार्थी निवडले जातात, अर्ज स्वीकारले जातात आणि संबंधित विभागांना पाठवले जातात आणि आवश्यक पाठपुरावा केला जातो. "स्वयंपूर्णमित्र" म्हणून गावात राहणारा एक वरिष्ठ सरकारी कर्मचारी, समन्वय ठेवण्यासाठी, देखरेख करण्यासाठी आणि सरकारी योजनेचा प्रत्येक लाभ गावातील गरजूंपर्यंत पोहोचेल हे सुनिश्चित करण्यासाठी नियुक्त केला जातो.
3KX7B5OW.jpg)


आधुनिक कृषी पद्धतींसाठी पंतप्रधानांकडून प्रशंसा मिळवलेल्या दर्शना पेडणेकर यांना गोवा सचिवालयात आढावा बैठकी दरम्यान राज्यमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आले. दर्शना पेडणेकर यांच्याकडे पर्रा, गोवा येथे चार एकर शेतजमीन आहे ज्यावर त्या भाताचे पीक आणि इतर पस्तीस विविध बागायती पिके घेतात. याव्यतिरिक्त, त्या एक उद्योजिका आहेत. त्यांनी लॉकडाऊन दरम्यान तेल काढण्यासाठी विक्री न झालेल्या नारळावर प्रक्रिया करायला सुरुवात केली. आयसीएआर गोवाने त्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण दिले. दर्शना पेडणेकर यांना भविष्यातही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन राज्यमंत्र्यांनी दिले आणि देशातील महिला सक्षमीकरणासाठी त्या एक आदर्श मॉडेल असल्याचे सांगून त्यांचे कौतुक केले.
S.Thakur/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1759746)
Visitor Counter : 234