माहिती आणि प्रसारण मंत्रालय

क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोकडून “सकस अन्न”कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 30 SEP 2021 5:34PM by PIB Mumbai

पणजी, 30 सप्टेंबर 2021

 

क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोने पोषण महिन्यानिमित्त आयोजित केलेल्या सकस अन्न कार्यक्रमाचे आज उद्‌घाटन करण्यात आले. महिला व बालकल्याण संचालक दिपाली नाईक यांनी तीन दिवसीय कार्यक्रमाचे उद्‌घाटन केले. क्षेत्रीय प्रचार अधिकारी रियाझ बाबू यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

महिला व बालकल्याण संचालनालयाने सप्टेंबर महिन्यात पोषणाविषयी जनजागृती करण्यासाठी 3,000 हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन केले. राज्यातून अल्पपोषण, अ‍ॅनिमिया यासारख्या समस्यांना हद्दपार करण्यासाठी सकस अन्नाविषयीची जनजागृतीवर भर देण्यात येत असल्याचे दिपाली नाईक म्हणाल्या.

डिआरडीए राज्य प्रकल्प अधिकारी श्रीमती आशा वेर्णेकर, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या डॉ जेनिफर लुईस कामत, गोवा होम सायन्स कॉलेजच्या प्रा. वर्षा नाईक यांची याप्रसंगी उपस्थिती होती. प्रा. वर्षा नाईक यांनी याप्रसंगी महिला बचत गटांना सकस अन्नपदार्थांविषयी मार्गदर्शन केले. 

क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोने काक्युलो मॉल इथे 10 महिला बचत गटांना तीन दिवसांसाठी आपले अन्नपदार्थ विक्रीसाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. सकस अन्नपदार्थांमध्ये औषधी गुणधर्मही आहेत. यामुळे नागरिकांनी यावर भर द्यावा, असे आवाहन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये पोषण अभियानाची सुरुवात केली. बालके, गर्भवती आणि स्तनदा माता यांच्या सर्वांगीण पोषणावर भर देण्यासाठी जनजागृती घडवून आणणे, हा या अभियानाचा उद्देश आहे.

आज आपला देश केवळ कोविड-19 महामारीविरोधातच नाही तर अल्प-पोषणाविरोधातही लढा देत आहे. 2021 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात पोषणाला चालना देण्यासाठी आराखडा मांडण्यात आला आहे.

 S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1759688) Visitor Counter : 139


Read this release in: English