संरक्षण मंत्रालय
पश्चिमी नौदल कमांडचा मध्यावधी देखभाल आढावा आणि पायाभूत सुविधा आढावा घेण्यात आला
Posted On:
30 SEP 2021 3:21PM by PIB Mumbai
मुंबई, 30 सप्टेंबर 2021
भारतीय नौदलाच्या पश्चिमी नौदल कमांडचा मध्यावधी देखभाल आढावा आणि मध्यावधी पायाभूत सुविधा उभारणीच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत 28 सप्टेंबर 2021रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकांचे उद्घाटन पश्चिमी नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, PVSM, AVSM, VSM, ADC, व्हॉईस अडमिरल आर.हरीकुमार यांनी केले. 28 आणि 29 सप्टेंबर 2021 असे दोन दिवस झालेल्या या आढावा बैठकांचे अध्यक्षपद चीफ ऑफ मटेरीअल, AVSM, VSM व्हॉईस अडमिरल संदीप नाथानी यांनी भूषविले. या दोन्ही बैठकांना नौदल मुख्यालय, पश्चिमी नौदल कमांडचे मुख्यालय, मुंबईतील नौदल गोदी, कारवारचे नौकादुरुस्ती यार्ड या कार्यालयांतील प्रतिनिधी, नौदल प्रकल्पांचे महासंचालक, नौदलाची चाचणी पथके, मुंबईची मटेरीअल संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

व्हॉईस अडमिरल आर.हरीकुमार मुंबई येथे एमवायआरआर च्या प्रतिनिधींना उद्घाटनपर संबोधन देताना
पश्चिमी नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ यांच्या उद्घाटनपर भाषणानंतर, COM व्हॉईस अडमिरल संदीप नाथानी यांनी आढावा मंडळासमोर केलेल्या भाषणात, युध्दनौकांच्या दुरुस्तीसाठी आणि पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी परेदशी OEMs वरील अवलंबित्व कमी करून आणि देशांतर्गत तंत्रज्ञानविषयक ज्ञानवर्धनाचे प्रयत्न वाढवून ‘आत्मनिर्भर भारत’ उभारण्यावर भर दिला. या वर्षीच्या आढाव्यात, नौदलाची जहाजे आणि पाणबुड्या यांना किनाऱ्यावरून देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये वाढ आणि विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

चीफ ऑफ मटेरीअल, व्हॉईस अडमिरल संदीप नाथानी पश्चिमी नौदल कमांडच्या मुंबई येथे झालेल्या आढावा बैठकीत अध्यक्षपदावरून प्रतिनिधींशी चर्चा करताना
याखेरीज, पश्चिमी नौदल कमांडच्या जहाजांची आणि पाणबुड्यांची दुरुस्ती करण्याच्या योजनांवर चर्चा, विद्यमान देखभाल धोरणांबाबत विवेचन आणि नौदलाच्या वाढत्या गरजा भागविण्यासाठी पायाभूत सुविधा विकासाच्या योजनांचा आढावा या मुद्यांचा देखील या आढावा बैठकीच्या मंचावर चर्चेसाठी विचारात घेतलेल्या विषयांमध्ये समावेश होता. तसेच, कारवारच्या नौदल तळावर विकसित होत असलेल्या आधारभूत सुविधांच्या कामाच्या प्रगतीचा देखील व्हॉईस अडमिरल संदीप नाथानी यांनी आढावा घेतला.

फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हॉईस अडमिरल आर.हरीकुमार यांच्यासोबत मुंबई येथील मध्यावधी देखभाल आढावा बैठकीसाठी उपस्थित असलेल्या सर्व प्रतिनिधींचा फोटो
Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1759635)
Visitor Counter : 228