संरक्षण मंत्रालय
195 वा गनर्स डे साजरा
प्रविष्टि तिथि:
28 SEP 2021 7:08PM by PIB Mumbai
पुणे, 28 सप्टेंबर 2021
दक्षिण कमांडच्या सर्व तोफखाना युनिट्स आणि विभागाने 28 सप्टेंबर 2021 रोजी 195 वा गनर्स डे साजरा केला. 28 सप्टेंबर या तारखेला रेजिमेंट ऑफ आर्टिलरीच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे. 5 (बॉम्बे) माउंटन बॅटरी 28 सप्टेंबर 1827 रोजी स्थापन केली गेली. स्थापनेपासून ती अखंडित सेवेमध्ये असल्यामुळे , तिचा स्थापना दिन दरवर्षी गनर्स डे म्हणून साजरा केला जातो.

आर्टिलरी रेजिमेंटला समृद्ध परंपरा आणि शौर्याच्या गौरवशाली भूतकाळाचा अभिमान आहे. जेव्हा जेव्हा आपल्या राष्ट्राच्या अखंडतेला धोका निर्माण झाला तेव्हा प्रत्येक प्रसंगी लढाई जिंकणारा घटक म्हणून तिने आपली ओळख निर्माण केली. दहशतवादविरोधी कारवायांमध्ये उत्कृष्ट योगदानाबद्दल गनर्सनी देखील प्रशंसा मिळवली आहे. युद्ध आणि शांतता मोहिमांमध्ये तसेच परदेशातील मोहिमांमध्ये देशाची सेवा करण्याचा रेजिमेंटचा गौरवशाली इतिहास आहे आणि व्यावसायिक उत्कृष्टता, निस्वार्थ आणि कर्तव्याप्रति समर्पणसाठी रेजिमेंट ओळखली जाते. संघर्षांदरम्यान आणि संकटे तसेच नैसर्गिक आपत्तींच्या वेळी तिने देशाची उल्लेखनीय सेवा केली आहे. रेजिमेंटला एक व्हिक्टोरिया क्रॉस, एक विशिष्ट सेवा ऑर्डर , स्वातंत्र्यपूर्व काळात 15 मिलिटरी क्रॉस आणि एक अशोक चक्र, सात महावीर चक्र, नऊ कीर्ती चक्र, 101 वीर चक्र, 63 शौर्य चक्र, 06 सेना पदक बार,युद्धभूमीवर तोफखान्यांनी दाखवलेल्या शौर्याची आणि व्यावसायिकतेची ओळख म्हणून अनेक सन्मानांसह 502 सेना पदकांनी गौरवले आहे. रेजिमेंटला स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्या काळात 40 सन्मान किताब गौरवण्यात आले आहे. रेजिमेंटने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उत्कृष्ट खेळाडूंना तयार केले आहे, एक पद्मश्री आणि आठ अर्जुन पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केल्याचा रेजिमेंटला अभिमान वाटतो. आधुनिक शस्त्र प्रणालींसह अधिक गतिशीलता आणि संहारक शक्तीसह भारतीय तोफखान्याची एक अत्याधुनिक लढाऊ दलामध्ये झपाट्याने प्रगती होत असून प्रगत आधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज झाल्याने या दलाचे " सर्वत्र इज्जत-ओ- इक्बाल (सर्वत्र सन्मान आणि गौरव ) हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवण्यास मदत होईल.
याप्रसंगी, लेफ्टनंट जनरल जे एस नैन, एव्हीएसएम, एसएम, जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ, सदर्न कमांड यांनी रेजिमेंट ऑफ आर्टिलरीने बजावलेल्या सेवेची प्रशंसा केली आहे.
M.Iyengar/S.Kane/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1759023)
आगंतुक पटल : 256
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English