माहिती आणि प्रसारण मंत्रालय

सोळाव्या ऑनलाईन रसास्वाद शिबिराचे 30 सप्टेंबर रोजी उद्घाटन

Posted On: 28 SEP 2021 12:42PM by PIB Mumbai

पुणे, 28 सप्‍टेंबर 2021

 

'राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय' आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया (पश्चिम विभाग) यांच्यातर्फे दरवर्षी 'चित्रपट रसास्वाद शिबिर' आयोजित केले जाते. 'कोविड-19' परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोळावे 'चित्रपट रसास्वाद शिबिर' ऑनलाईन पद्धतीने आयोजित केले जाणार आहे. हे शिबिर 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

यंदा सोळाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चित्रपट रसास्वाद शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय पारितोषिक विजेते चित्रपट अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते येत्या गुरूवारी म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

चित्रपट रसिकांमध्ये चित्रपट कलेविषयी अधिक माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने सात दिवस या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेतून चालणारा हा एकमेव उपक्रम दरवर्षी आयोजित केला जात असतो. यंदा या शिबिराचे सोळावे वर्ष आहे.

या शिबिरात यंदा राज्यातून अनेक प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असून त्यात पुणे-पिंपरी चिंचवडसह मुंबई, ठाणे, कल्याण, पनवेल, नवी मुंबई, औरंगाबाद, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, परभणी तसेच गोवा आणि गुजरात येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत दुपारी 4 ते रात्री साडे नऊ या वेळेत चालणाऱ्या या शिबिरात विद्यार्थ्यांना विकास देसाई, श्यामला वनारसे, समर नखाते, उमेश कुलकर्णी, उज्ज्वल निरगुडकर, गणेश मतकरी, प्रकाश मगदूम, अनुपम बर्वे, अभिजीत रणदिवे, संतोष पाठारे, दीपक देवधर, प्रशांत धर्माधिकारी, पियुष शाह, सुहास किर्लोस्कर हे चित्रपट विश्लेषक मार्गदर्शन करणार आहेत. शिबिराचे समन्वयक सतीश जकातदार असून अधिक माहितीसाठी त्यांना 9822975882 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

शिबिरातील प्रशिक्षणार्थीना सहभाग प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

* * *

(Source: NFAI)/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1758851) Visitor Counter : 154