वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
एमपीईडीए क्षेत्रीय प्रभाग, मुंबई आणि नेटफिश ने ससून डॉक फिशिंग बंदर, मुंबई येथे आझादीचा अमृत महोत्सव साजरा केला
Posted On:
27 SEP 2021 5:44PM by PIB Mumbai
मुंबई, 27 सप्टेंबर 2021
"आझादी का अमृत महोत्सव" चा एक भाग म्हणून स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ साजरा करण्या हेतु, वाणिज्य विभाग, भारत सरकार 20 ते 26 सप्टेंबर, 2021 पर्यंत आर्थिक विकास, विशेषतः भारतातील निर्यातीला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करून " वाणिज्य सप्ताह" आयोजित करत आहे. या संदर्भात, समुद्री उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (एमपीईडीए), क्षेत्रीय प्रभाग, मुंबई ने नेटफिश आणि सीफूड एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने “आझादी का अमृत महोत्सव” साजरा केला आणि ससून डॉक फिशिंग हार्बर, मुंबई येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. पंधरा मासेमारीच्या जहाजांच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली होती ज्यात मासेमारीच्या जहाजांना भारतीय ध्वज, आझादी का अमृत महोत्सव झेंडे, बॅनर, तिरंगा आणि सजावटीच्या वस्तूंनी सजवण्यात आले होते आणि समुद्रात प्रवेश केला गेला.
महाराष्ट्र शासनाचे मत्स्यव्यवसाय आयुक्त डॉ.अतुल पाटणे यांनी या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली आणि यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. पाहुण्यांसह थोड्या अंतरासाठी समुद्रात जाणाऱ्या मासेमारी बोटींपैकी एकावर ध्वजवंदन समारंभ आयोजित करण्यात आला होता. मासेमारी करणाऱ्यांना टी-शर्ट, कॅप्स, मास्क आणि बॅजचे वितरण करण्यात आले. मुंबईतील फिशरी सर्व्हे ऑफ इंडिया, नेट मेंडींग हॉलमध्ये "शाश्वत भविष्यासाठी जबाबदार मासेमारी" या विषयावर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला ज्यामध्ये सीएमएफआरआई , मुंबईचे श्री अजय नखवा आणि नेटफिश- एमपीईडीए च्या डॉ.गिरिजा सौरभ बेहेरे यांनी अनुक्रमे शाश्वत भविष्यासाठी किशोर मासेमारी आणि जबाबदार मासेमारी यावर व्याख्याने दिली.
श्री. राजेंद्र जाधव, मत्स्यव्यवसाय आयुक्त, महाराष्ट्र सरकार, डॉ. एल.एन मूर्ती, सीआयएफटी, मुंबईचे प्रधान शास्त्रज्ञ, डॉ. श्रीनाथ पी.जी., उप संचालक, एमपीईडीए क्षे.प्र., मुंबई, श्री संजय वाटेगावकर, मत्स्यपालन आयुक्त, महाराष्ट्र सरकार, श्री. शिर्के, एमआईडीसी , श्री अजय नखवा, सीएमएफआरआई, मुंबई चे शास्त्रज्ञ, श्री. अशोक कदम, एफएसआई चे मत्स्य शास्त्रज्ञ, श्री पवन भारती, जनसंपर्क अधिकारी, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि इतर अधिकारी जसे मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई पोलीस, राज्य विभाग मत्स्यव्यवसाय, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था आणि मत्स्य व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष आदि जनजागृती कार्यक्रम आणि मासेमारीच्या प्रवासादरम्यान उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संघटनेसाठी मच्छीमारांनी पाठिंबा आणि सकारात्मक प्रतिसाद दिला. ससून डॉक फिशिंग हार्बर मधील उत्साही मच्छीमार समुदायाद्वारे एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यात पारंपारिक मच्छीमार नृत्य सादर केले.
श्री सुब्राय पवार, सहाय्यक संचालक, एमपीईडीए, मुंबई यांनी आभार मानले.सीफूड एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि सीफूड एक्सपोर्टर ऑफ इंडिया आणि मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम प्रायोजित केला गेला . एमपीईडीए, नेटफिश, नौदल, पोलीस विभाग, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या संघटनेत सक्रिय सहभाग घेतला.
ससून डॉक फिशिंग बंदरावर मासेमारी जहाजावर ध्वजारोहण समारंभ
* * *
PIB Mumbai/MPEDA/DR
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1758627)
Visitor Counter : 195