संरक्षण मंत्रालय
पश्चिमी कमांड नौदलाकडून नौकानयन स्पर्धेचे आयोजन
मुंबई विभागाने पटकावली सर्वाधिक पदके
Posted On:
27 SEP 2021 4:40PM by PIB Mumbai
मुंबई, 27 सप्टेंबर 2021
मुंबईतील भारतीय नौदल वॉटरमॅनशिप प्रशिक्षण केंद्रात 23 ते 26 सप्टेंबर 2021 या कालावधीत नौदलाच्या पश्चिमी कमांडच्या जवानांसाठी यावर्षीच्या नौकानयन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पश्चिमी नौदल कमांडच्या अंतर्गत असणाऱ्या सात संघांतील 59 जवानांनी या स्पर्धेत भाग घेतला.

लेसर (स्टँडर्ड), लेसर (रॅडीयल), लेसर (बहिया), एन्टरप्राईझ, बिक-नोव्हा, 29-एर आणि जे 24 या सात प्रकारच्या श्रेणीतील बोटींच्या नौकानयन स्पर्धा घेण्यात आल्या. संघभावना बळकट करण्यासाठी आणि सहभागाची कक्षा अधिक रुंदावण्यासाठी एन्टरप्राईझ प्रकारातील सांघिक स्पर्धा आणि जे 24 प्रकारातील मॅच रेसिंग स्पर्धा यावर्षी पुन्हा सुरु करण्यात आल्या.

कमांड नौकानयन प्रशिक्षण आणि यॉटिंग समन्वयक कोमोडोर गगन कौशल यांनी 26 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या समारोप समारंभात विजेत्यांना पदके प्रदान केली.

या स्पर्धेत मुंबई विभाग संघ एकूण पारितोषिक विजेता संघ ठरला तर फ्लीट बी संघ दुसऱ्या स्थानी होता.
* * *
S.Thakur/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1758584)
Visitor Counter : 166