वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
निर्यातदारांसाठी ‘वाणिज्य उत्सव’ संमेलनाचे पुणे येथे आयोजन
Posted On:
24 SEP 2021 6:10PM by PIB Mumbai
पुणे, दि. 24 सप्टेंबर 2021
‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्त केंद्र सरकारच्या विदेश व्यापार महासंचालनालय, वाणिज्य व उद्योग मंत्रालय, भारत सरकार व उद्योग संचालनालय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने निर्यातदारांचे एक दिवसीय ‘वाणिज्य उत्सव’ संमेलन शुक्रवार, दि. २४ सप्टेंबर २०२१ रोजी पुण्यातील डॉ. शिरनामे सभागृह, कृषि महाविद्यालय आवार, शिवाजीनगर, येथे आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला केंद्रीय विदेश व्यापार विभागाचे संयुक्त महासंचालक श्री वरुण सिंह,राज्याचे उदयोग विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. प्रकाश रेंदाळकर आदि मान्यवर उपस्थित होते. राज्यातील सुक्ष्म,लघु,मध्यम उदयोजकांच्या उत्पादनाची निर्यात वाढावी.याकरता राज्य सरकार लवकरच निर्यात धोरण आणणार असुन यातुन त्यांना मदत होणार आहे अशी माहिती श्री हर्षदीप कांबळे यांनी दिली.

राज्यात औदयोगिक क्षेत्र मोठे असुन देशाच्या एकुण निर्यातपैकी चाळीस टक्के वाटा हा महाराष्ट्राचा आहे. येत्या काही दिवसात प्रत्येक जिल्हयातील जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विविध उदयोगाकरता एक्स्पोर्ट हब उभारले जाणार आहे. असेही श्री कांबळे यांनी यावेळी सांगितले.

या संमेलनात निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना औद्योगिक समुह, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमांचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, आदि सहभागी झाले होते.

***
DJM/SP/PK
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1757768)
Visitor Counter : 98