शिक्षण मंत्रालय

आयआयटी मुंबईने सुरु केले 'अशांक देसाई धोरण अभ्यास केंद्र'


प्रा. कौशिक बसू, डॉ. नौशाद फोर्ब्स आणि यामिनी अय्यर यांच्या अध्यक्षतेखाली आभासी माध्यमातून उद्घाटन कार्यक्रम

Posted On: 22 SEP 2021 8:02PM by PIB Mumbai

मुंबई, 22 सप्‍टेंबर 2021

 

भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईने काल (२१ सप्टेंबर, २०२१) संस्थेत आयोजित केलेल्या आभासी माध्यमातून झालेल्या कार्यक्रमा दरम्यान ‘अशांक देसाई धोरण  अभ्यास केंद्र (एडीसीपीएस)’ सुरू करण्यात आले. अर्थशास्त्राचे प्राध्यापक आणि कॉर्नेल विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय अभ्यासाचे प्राध्यापक कौशिक बसू, भारतातील आघाडीची वाफ अभियांत्रिकी आणि नियंत्रण साधने कंपनी फोर्ब्स मार्शल कंपनीचे सह-अध्यक्ष डॉ. नौशाद फोर्ब्स,  धोरण संशोधन केंद्राच्या अध्यक्ष आणि  मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती यामिनी अय्यर आणि आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी आणि मास्टेक लिमिटेडचे संस्थापक, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, आयआयटी मुंबई येथील धोरण अभ्यास केंद्राला सढळ हस्ते देणगी दिलेले, या नवोदित क्षेत्राला अत्यंत आवश्यक प्रोत्साहन ज्यांनी दिले आहे ते  श्री.अशांक देसाई या मान्यवर व्यक्ती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

डॉ. फोर्ब्स आणि प्रा.बसू यांनी उद्घाटनपर भाषण दिले. एडीसीपीएसबद्दल बोलताना डॉ फोर्ब्स म्हणाले की, " धोरणात्मक दृष्टीकोनातून या विषयात ठोस सैद्धांतिक समज आणि शैक्षणिक कार्य ,उत्तम सार्वजनिक धोरणाने एकत्र आणले पाहिजे.आपल्या अग्रगण्य संशोधन आणि शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी मुंबई येथे हे केंद्र असल्यामुळे ते अत्यंत  मोलाची भूमिका बजावू शकते . आयआयटी मुंबईच्या आवारातील  इतर विभागांसोबत सहयोगाने काम करून,आपण सैद्धांतिकदृष्ट्या योग्य आणि शक्य  धोरण विकसित करू शकतो "

प्रा.बसू म्हणाले, “या संस्थेची स्थापना करण्यासाठी आयआयटी मुंबईचा दृष्टिकोन आणि सढळ हस्ते दिलेली देणगी  आणि हे केंद्र स्थापन करण्यासाठी साहाय्य करण्यात  दूरदृष्टी दाखविणाऱ्या श्री.अशांक देसाई यांचे मी अभिनंदन करतो. आपल्याला उच्च दर्जाची तांत्रिक संशोधन आणि धोरण केंद्रे हवी आहेत, जी तांत्रिक संशोधन आणि धोरणनिर्मितीसंदर्भातील जगातील दरी कमी करू शकतील आणि आयआयटी मुंबई हे  त्याचे प्रतीकात्मक स्वरूप आहे. यावर माझा बऱ्याच काळापासून विश्वास आहे. आयआयटी मुंबईसारख्या सारख्या सर्वोच्च स्थानावर असलेल्या संस्थेत ‘अशांक देसाई धोरण अभ्यास केंद्राची’ स्थापना करण्यात आली याचा मला आनंद आहे.''

या कार्यक्रमाचे विवेचन करणाऱ्या श्रीमती अय्यर म्हणाल्या की, ''विश्वासार्ह संशोधन आणि धोरणात्मक संवाद करण्यासाठी संस्थात्मक पाया मजबूत करणे हे भारतासाठी महत्वपूर्ण आहे. ज्ञान बांधणी, ज्ञान निर्मिती आणि एकाच वेळी धोरणासह संवाद साधण्यासाठी योगदान देणाऱ्या विद्यापीठ आणि नागरी समाजातील बळकट, काटेकोर आणि स्वतंत्र संस्थांच्या परिसंस्थेची भारताला गरज आहे. एडीसीपीएस हे भारतातील  सार्वजनिक जीवनात खरोखर महत्वाचे योगदान आहे आणि मी भविष्यातील संशोधकांशी आणि केंद्रातील विद्यार्थ्यांसोबतच्या संवादासाठी मी  उत्सुक आहे''. 

केंद्राच्या उदघाटनपर  कार्यक्रमात बोलताना श्री.अशांक देसाई म्हणाले, “वेगाने बदलणारे तंत्रज्ञान आणि धोरणांचा परिणाम यामुळे धोरण तयार करणे हे सतत अत्यंत गुंतागुंतीचे आणि कठीण होत राहणार आहे.आपल्याला बौद्धिक अंतर्दृष्टी आणि संवादावर आधारित निःपक्षपाती सल्ल्याची आवश्यकता आहे.तसेच, धोरणकर्त्यांना धोरण निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये पाठबळ देण्यासाठी करिअर व्यावसायिक तयार करणे गरजेचे आहे. संशोधन आणि शिक्षणासह तंत्रज्ञान आणि सामाजिक विषयांचा समावेश असलेल्या आणि उल्लेखनीय यशाची नोंद असलेल्या  आयआयटी मुंबईची या कार्यासाठी निवड अतिशय योग्य आहे.माझ्या गुरुकुलाला  परतफेड म्हणून,माझे योगदान धोरण केंद्राला परिणामकारकतेच्या  पुढील स्तरावर जाण्यासाठी  सक्षम करेल. ”

धोरण अभ्यास केंद्र  (सीपीएस) बद्दल

सार्वजनिक धोरणाच्या अभ्यासामध्ये स्वत:ला एक नेतृत्व म्हणून स्थान देऊन भारतात धोरण अभ्यासाची क्षमता निर्माण करण्यासाठी आयआयटी मुंबई  येथे 2016 मध्ये सीपीएसची स्थापना करण्यात आली. केंद्राच्या कार्यात, भारतातील धोरण निर्मितीवर  आणि मूल्यांकनावर विशेष लक्ष केंद्रित करण्यासह  विविध धोरण क्षेत्रात पुरावा-आधारित, सहयोगी आणि महत्वाचे  संशोधन प्रदान करून अंतःविषय संशोधन समाविष्ट आहे.

श्री देसाई यांनी दिलेल्या  देणगीचा निधी केंद्राच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आणि त्यानंतरच्या 10 वर्षांच्या कालावधीत देखभाल करण्यासाठी वापरला जाईल.

श्री.अशांक देसाई यांच्याबद्दल:

श्री.अशांक देसाई हे एक माहिती तंत्रज्ञान (“आयटी ”) उद्योजक आणि भारतातील एक आदरणीय व्यावसायिक व्यक्तिमत्व आहे आणि ते मास्टेक लिमिटेडचे संस्थापक, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.ते नॅसकॉमचे संस्थापक सदस्य आणि माजी अध्यक्ष आहेत.सध्या ते आयआयटी मुंबई येथे नवोन्मेष आणि उद्यमशीलता संस्थेचे (एसआयएनई)चे उपाध्यक्ष आहेत.ते आयआयटी मुंबईचे एक प्रतिष्ठित माजी विद्यार्थी आहेत आणि भारतीय व्यवस्थापन संस्था अहमदाबादचे (आयआयएमए) माजी विद्यार्थी आहेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा

श्रीमती फाल्गुनी बॅनर्जी नाहा,

जनसंपर्क अधिकारी,

माहिती तंत्रज्ञान संस्था, मुंबई

दूरध्वनी क्रमांक: 25767026 | ई-मेल : pro@iitb.ac.in

 

* * *

M.Chopade/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1757071) Visitor Counter : 216


Read this release in: English