वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते दोन दिवसीय वाणिज्य उत्सवाचे उद्‌घाटन, गोव्याची निर्यात क्षमता आणि भविष्य केंद्रस्थानी


गोव्यातील लॉजिस्टिक पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सरकार प्रयत्नशील : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पायाभूत सुविधा, जीवनशैली आणि संसाधनांच्या संयोगामुळे गोव्यात उच्च निर्यात क्षमता : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

Posted On: 21 SEP 2021 7:24PM by PIB Mumbai

पणजी, 21  सप्टेंबर 2021

स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी  केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने  आयोजित केलेल्या उपक्रमांचा एक भाग म्हणून आज गोव्यात वाणिज्य उत्सव या दोन दिवसीय निर्यात परिषदेचे उदघाटन करण्यात आले. 21 सप्टेंबर 2021 रोजी, आज उद्‌घाटन सत्राला संबोधित करताना गोव्याचे  मुख्यमंत्री म्हणाले की, किनारपट्टी असलेल्या राज्यातून निर्यात व्यवहारांना चालना देण्याच्या उद्देशाने, गोव्यातील लॉजिस्टिक पायाभूत सुविधा  सुधारण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. स्वयंपूर्ण गोव्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गोव्यातील सर्व उपलब्ध स्रोतांचा  योग्य वापर केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत असलेल्या वाणिज्य विभागाच्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालय (डीजीएफटी ) आणि गोवा सरकारच्या  उद्योग, व्यापार आणि वाणिज्य संचालनालयाने, कापूस वस्त्र निर्यात प्रोत्साहन परिषद (TEXPROCIL) च्या सहकार्याने, गोव्यात डोनापौला मधील  तिसवाडी येथील आंतरराष्ट्रीय केंद्रात या परिषदेचे आयोजन केले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, नवीन संधी शोधून आणि नव्या बाजारपेठांमध्ये  प्रवेश करून गोव्याची निर्यात क्षमता वाढवणे हे आमचे ध्येय आहे. गोव्याला निर्यात केंद्र आणि उर्वरित देशासाठी एक आदर्श निर्यात राज्य बनविण्याच्या दृष्टीने, आपण सर्वांनी खांद्याला खांदा लावून कार्य करायला हवे''. आम्हाला भारत सरकारच्या सहकार्याने गोवा राज्याच्या निर्यात अर्थव्यवस्थेला चालना देऊन  विकासाच्या दुहेरी इंजिनमुळे मिळणारे लाभ प्राप्त करता येतील तसेच  आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोव्याचे स्वप्न पूर्ण करता येईल , असे श्री सावंत म्हणाले.

केंद्रीय बंदरे, पर्यटन, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री श्री श्रीपाद नाईक म्हणाले की, विविध बंदरे, रेल्वे, रस्ते, विमानतळ, मुबलक जलसंपदा, उत्कृष्ट जीवनशैली, पायाभूत सुविधा आणि संसाधने यांच्या उपलब्धतेमुळे गोव्याकडे उच्च निर्यात क्षमता आहे. गोवा हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पर्यटन स्थळ आहे. कोविड -19  चा पर्यटन क्षेत्राला मोठा झटका बसला तरी 2019 मध्ये, 9.37 लाखांहून अधिक विदेशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली. कोविड संकटाने भविष्यात या  क्षेत्राला शाश्वत आधारावर आयाम  देण्यासाठी संधी प्रदान केली आहे '', असे त्यांनी सांगितले. राज्यातील कंटेनर सेवा आणि पर्यटन क्षेत्राला  शक्य तितके पाठबळ देण्याची विनंती मंत्र्यानी उद्योग क्षेत्राला केली.

गोवा सरकारचे आरोग्य, उद्योग, व्यापार आणि वाणिज्य, महिला आणि बाल विकास आणि कौशल्य विकास मंत्री श्री विश्वजित राणे म्हणाले की, विविध राज्यांनी  स्वीकारलेल्या  सर्वोत्तम पद्धती ओळखण्याची गरज आहे. आम्ही  कौशल्य विकसित करण्यासाठी  आणि उद्योगांना भेडसावत असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी देखील काम करत आहोत.  निर्यातभिमुख घटकांना पाठबळ देण्याच्या दृष्टीने आणि गोव्यातुन  नैसर्गिक संसाधनांची  निर्यात कशाप्रकारे करावी  हे पाहण्यासाठी आपल्याला  या धोरणाबाबत चौकटीबाहेर विचार करून शिकण्याची आवश्यकता आहे ,असं ते म्हणाले. "प्रशिक्षण, अभिमुखता, महिलांचे कौशल्य आणि व्यवसाय सुलभता खूप महत्वाची आहे," असं मंत्री म्हणाले.

भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त भारत सरकारने आयोजित केलेल्या कार्यक्रमांच्या अनुषंगाने या दोन दिवसीय प्रदर्शनासह   परिषदेचे  आयोजन  केले आहे.गोव्यात निर्यातीबाबत झालेली  प्रगती अधोरेखित करणे,  निर्यात क्षमतेचे प्रदर्शन ,परिसंवाद आयोजित करणे आणि राज्यातील निर्यात परिस्थिती सुधारण्यासाठी धोरणांवर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने हे सर्व संबंधित भागधारकांना एकाच छताखाली एकत्र आणण्याचे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.

गोव्यातून होणाऱ्या निर्यातीचा संक्षिप्त आढावा:

गोव्याचा आर्थिक विकास हा  खाण, पर्यटन आणि औषधोत्पादन यांसारख्या औद्योगिक क्षेत्रांच्या सक्षम कामगिरीमुळे होतो.

आर्थिक वर्ष 

निर्यात मूल्य         

वाढ

2020-21  

17,095 कोटी (भारताच्या एकूण निर्यातीच्या 0.79%)

--

2021-22 (जून पर्यंत)

4,621 कोटी    

16.67% (वर्ष-प्रति-वर्ष)

 

 

M.Chopade/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1756794) Visitor Counter : 222


Read this release in: English