संरक्षण मंत्रालय
क्रांती मैदान, फोंडा गोवा येथे विजय मशालीचे स्वागत
Posted On:
15 SEP 2021 7:20PM by PIB Mumbai
मुंबई, 15 सप्टेंबर 2021
गोवा येथे फोंडा येथील क्रांती मैदानात आज लष्कराच्या 6 टेक्निकल ट्रेनिंग रेजिमेंट आणि 2 सिग्नल ट्रेनिंग सेंटरद्वारे आयोजित समारंभात संपूर्ण लष्करी सन्मानाने स्वर्णिम विजय मशालीचे स्वागत करण्यात आले. गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री श्री गोविंद गावडे आणि नागरी प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 1971 च्या युद्धात सहभागी निवृत्त सैनिकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

मंत्र्यांनी युद्ध स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून 1971 च्या युद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर वीरांचा सन्मान केला आणि युद्धातील माजी सैनिकांना स्मृतिचिन्ह प्रदान केली. सशस्त्र दलांतील सदस्यांना, विशेषतः सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे असं आवाहन त्यांनी केले.

पुढील ठिकाणी पोहोचण्यासाठी मार्गस्थ होण्यापूर्वी फोंडा येथील समारंभ हा विजय मशालीचा गोव्यातील शेवटचा लष्करी कार्यक्रम होता, या विजयी मशालीचा प्रवास 16 डिसेंबर 21 रोजी नवी दिल्ली येथे संपणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जमलेल्या गोव्यातील नागरिकांसाठी ही अत्यंत अभिमानाची आणि सन्मानाची बाब होती.

* * *
M.Iyengar/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1755202)
Visitor Counter : 131