माहिती आणि प्रसारण मंत्रालय
हिंदी दिवस 2021: फिल्म प्रभागद्वारे "हिंदी: भारत की वाणी" या ऑनलाइन चित्रपट महोत्सवाचे आयोजन
हिंदी साहित्यातील महान दिग्गजांवर आधारित माहितीपट इथे बघा - https://www.youtube.com/FilmsDivision
कार्यालयीन कामकाजात व्यावहारीक हिंदीच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी 1 ते 15 सप्टेंबर 2021 दरम्यान फिल्म प्रभागद्वारे पाळला जाणार हिंदी पंधरवडा याकाळात विविध स्पर्धांचेही आयोजन
Posted On:
13 SEP 2021 7:45PM by PIB Mumbai
मुंबई, 13 सप्टेंबर 2021
14 सप्टेंबर 1949 या ऐतिहासिक दिवशी हिंदी ही भारतीय प्रजासत्ताकाची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारली गेली. याचे औचित्य साधून फिल्म प्रभाग ऑनलाइन चित्रपट महोत्सव आणि इतर विविध स्पर्धा आयोजित करून हिंदी दिवस -2021 साजरा करत आहे.
"हिंदी: भारत की वाणी" हा ऑनलाइन चित्रपट महोत्सव फिल्म प्रभागच्या संकेतस्थळ https://filmsdivision.org/ आणि युट्यूब वाहिनी https://www.youtube.com/FilmsDivision यावर 14 आणि 15 सप्टेंबर, 2021 रोजी दाखवला जाणार आहे.

हिंदी दिन महोत्सव-2021 अंतर्गत कार्यालयीन कामकाजात व्यावहारीक हिंदीच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी 1 ते 15 सप्टेंबर 2021 दरम्यान फिल्म प्रभागद्वारे हिंदी पंधरवडा पाळला जाणार आहे. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हिंदीमध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. डिक्टेशन, निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा या त्यापैकी काही स्पर्धा आहेत.

ऑनलाइन चित्रपट महोत्सव "हिंदी: भारत की वाणी" मध्ये प्रदर्शित होणारे चित्रपट पुढील प्रमाणे आहेत:
14 सप्टेंबर, 1949 (17 मि./ 1991/ मुझिर रेहमान)
भारत की वाणी (52 मि./ 1990/ सी. एस. नायर),
हिंदी के बढते कदम (13 मि./2021/आर. रवी)
यासह, लोकप्रिय साहित्यिक प्रेमचंद, आधुनिक हिंदी साहित्याचे जनक- भारतेंदू हरिश्चंद्र, राष्ट्रकवी मैथिली शरण गुप्ता, महान लेखक आणि कवी जय शंकर प्रसाद, सूर्यकांत त्रिपाठी निराला, राम धारी सिंह दिनकर, गोपालदास नीरज आणि प्रसिद्ध लेखक आणि संपादक आचार्य शिवपूजन सहाय यांच्या जीवनचरीत्रावर आधारीत माहितीपट, दोन दिवसीय ऑनलाइन चित्रपट महोत्सवादरम्यान दाखवले जाणार आहेत.
हे सर्व चित्रपट https://filmsdivision.org/ ‘डॉक्युमेंटरी ऑफ द वीक’ विभागात आणि एफडीच्या यूट्यूब वाहिनीवर 14-15 सप्टेंबर 2021 रोजी 48 तास दाखवले जाणार आहेत.
* * *
M.Chopade/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1754633)
Visitor Counter : 150