संरक्षण मंत्रालय

हरित उपक्रमांचा भाग म्हणून नौदलाच्या पश्चिम कमांडमध्ये इलेकट्रीकल वाहनांचा समावेश

Posted On: 09 SEP 2021 3:51PM by PIB Mumbai

 मुंबई, 9 सप्टेंबर 2021

मुंबईतील नौदल पश्चिम कमांडने निवासी भागात वापरण्यासाठी पर्यावरणपूरक 19 नवीन बहुउद्देशीय इलेक्ट्रिकल वाहने (EVs) कमांडमध्ये समाविष्ट केली आहेत. ही वाहने भरवशाची, उर्जा-कार्यक्षम आणि कमी देखभाल लागणाऱ्या बॅटरीने सुसज्ज आहेत.

08 सप्टेंबर 21 रोजी, पश्चिम विभागाच्या नेव्ही वाइव्हज वेलफेअर असोसिएशनच्या  (एनडब्ल्यूडब्ल्यूए) अध्यक्षा श्रीमती कला हरी कुमार यांनी या इलेक्ट्रिकल वाहनांना हिरवा झेंडा दाखवला. या इलेक्ट्रिकल  वाहनांचा  वापर नौदल कर्मचारी आणि निवासी भागात मालाच्या वाहतुकीसाठी केला जाईल.

वर्ष 2024 पर्यंत हवेतील प्रदूषणकारी घटक 20-30% कमी करण्यासाठी  भारत सरकारने 2019  मध्ये सुरू केलेल्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाच्या अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

या वाहनांचा समावेश भारतीय नौदलाच्या विविध हरित उपक्रमांपैकी एक आहे.ही  वाहने वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतील आणि पर्यावरण संरक्षणाला मदत करतील.

 

Jaydevi PS/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1753510) Visitor Counter : 122


Read this release in: English