संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय हवाई दलाच्या मेंटेनन्स कमांडचे प्रमुख एअर मार्शल शशीकर चौधरी यांची हवाई दलाच्या पुणे स्थित बेस रिपेयर डेपोला भेट


Posted On: 08 SEP 2021 8:10PM by PIB Mumbai

पुणे, 8 सप्‍टेंबर 2021 

 

भारतीय हवाई दलाच्या मेंटेनन्स कमांडचे कमांडिंग इन चीफ, अतिविशिष्ट सेवापदक, विशिष्ट सेवापदक प्राप्त एअर मार्शल शशीकर चौधरी यांनी  07 आणि 08 सप्टेंबर 2021 रोजी , एअर फोर्स वाइफ्स वेल्फेअर असोसिएशन (प्रादेशिक) च्या अध्यक्ष श्रीमती अनिता चौधरी यांच्यासह हवाई दलाच्या पुणे स्थित बेस रिपेयर डेपोला  भेट दिली. एअर कमोडोर केएसएस प्रसाद, एअर ऑफिसर कमांडिंग, बेस रिपेअर डेपो आणि एअर फोर्स वाइफ्स वेल्फेअर असोसिएशन (स्थानिक) च्या अध्यक्ष श्रीमती के श्रीलथा यांनी त्यांचे स्वागत केले.

एअर मार्शल चौधरी यांनी डेपोने राबवलेल्या कामांचा आढावा घेतला आणि  ग्राउंड सपोर्ट यंत्रणेसह विविध उपक्रमांना चालना देण्यासाठी डेपोने बजावलेल्या अग्रगण्य भूमिकेबद्दल त्यांना माहिती देण्यात आली. थर्मल इमेजिंग तंत्रज्ञान, आधुनिक स्वयंचलित चाचणी उपकरणे आणि पर्यावरणीय पडताळणीच्या  व्यापक वापराद्वारे विमान विज्ञानातील जटिल  घटकांची  दुरुस्ती करणे यासह स्वदेशी घडामोडींसाठी अनुरूप दृष्टिकोनासह 'आत्मनिर्भर भारत' चे ध्येय साध्य करण्यासाठी डेपोने उचललेल्या पावलांची त्यांनी प्रशंसा केली. त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय हवाई दलाच्या देखभाल आणि कार्यान्वयनाची  तयारी वाढवण्यासाठी ब्लॉक चेनची क्षमता वापरण्याच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. क्षमता बांधणी आणि क्षमता वाढवण्याच्या गरजेवर आणि स्वावलंबी होण्यावर भर देत एअर मार्शल यांनी , कार्यान्वयनासाठी महत्वाच्या देशांतर्गत उपाययोजना शोधण्यासाठी आणि विकसित करण्याच्या दृष्टीने  शैक्षणिक क्षेत्रात नवोन्मेषासाठी आणि कार्यरत राहण्यासाठी डेपोतील हवाई योद्ध्यांना प्रोत्साहित केले. 

एअर मार्शल यांनी  डेपोच्या कर्मचार्‍यांना कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कोविड प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि 'कर्मवीर' या नावाशी ठाम  राहण्यासाठी सतत प्रयत्न करणे सुरू ठेवण्याचे निर्देश दिले.

महामारीच्या  काळात हाती घेण्यात आलेले विविध पुढाकार  आणि कल्याणकारी उपक्रमांविषयी.श्रीमती अनिता चौधरी यांना माहिती देण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी डेपोने केलेल्या  प्रयत्नांचे त्यांनी  कौतुक केले.

 

* * *

M.Iyengar/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1753308) Visitor Counter : 117


Read this release in: English