माहिती आणि प्रसारण मंत्रालय

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर आधारित लघुपटाचे प्रदर्शन करून फिल्म्स् डिव्हिजन साजरा करणार शिक्षक दिन

Posted On: 04 SEP 2021 10:16PM by PIB Mumbai

 

भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान तत्ववेत्ते आणि शिक्षणतज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी भारतात शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. फिल्म्स डिव्हिजन आपल्या संकेतस्थळावर आणि यूट्युब चॅनेलवर त्यांच्या जीवनावर आधारित लघुपटाचे प्रदर्शन करून या महान विद्वानांना अभिवादन करणार आहे.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन- भारताचे राष्ट्रपती(38 मि/ इंग्रजी/ एन एस थापा) यामध्ये त्यांच्या विविध गुणवैशिष्ट्यांचे दर्शन घडते. शिक्षणासाठी झटणारे, जागतिक एकात्मता आणि सौहार्दाची भावना निर्माण करणारे त्यांचे व्यक्तिमत्व याची ओळख होते. हा लघुपट  https://filmsdivision.org/  Documentary of the Week आणि https://www.youtube.com/user/FilmsDivision  येथे 5 सप्टेंबर रोजी 24 तास प्रदर्शित केला जाईल.

***

Jaydevi PS/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1752169) Visitor Counter : 108


Read this release in: English