विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
ए. व्ही. झिरमूनस्की राष्ट्रीय सागरी जीवशास्त्र विज्ञान केंद्र, रशिया आणि सीएसआरआर-राष्ट्रीय सागरीविज्ञान संस्था-गोव्यादरम्यान सामंजस्य करार
Posted On:
01 SEP 2021 3:23PM by PIB Mumbai
गोवा, 1 सप्टेंबर 2021
रशियन अकादमी ऑफ सायन्सेस(NSCMB FEB RAS) येथील ए.व्ही. झिरमुनस्की सागरी जीवशास्त्र विज्ञान राष्ट्रीय संस्था आणि भारतातील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद- राष्ट्रीय सागरीविज्ञान संस्था, गोवा (CSIR-NIO) या दोन संस्थांदरम्यान सागरी जीवशास्त्र, सागरी परिसंस्था आणि नील अर्थक्रांती या विषयांवरील सहकार्याबाबत एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा करार, हिंद महासागर प्रदेश (भारतीय ईईझेडच्या पलीकडे), प्रशांत आणि ध्रुवीय प्रदेश, अशा भागांसाठी असून, दोन्ही देशांसाठी लाभदायक तसेच या संशोधनाशी संबंधित आंतरराष्ट्रीय घटकांसाठीही हितावह तरतुदी त्यात आहेत.
26 ऑगस्ट रोजी या करारावर आभासी पद्धतीने स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. प्रो इनेस्सा द्यूव्हीझेन, NSCMB FEB RAS आणि सीएसआरआर-एनआयओ चे संचालक सुनील कुमार सिंग यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी दोन्ही संस्थांचे प्रतिनिधी आणि मान्यवर सदस्य उपस्थित होते. त्याशिवाय, भारताच्या रशियातील दुतावासाचे अधिकारीही उपस्थित होते.

या सामंजस्य करारामुळे, भारत आणि रशियातील वैज्ञानिकांना जीवशास्त्रीय सागरी विज्ञान क्षेत्रातील संयुक्त उपक्रमांविषयी एक निश्चित आराखडा तयार करता येईल. ज्यामुळे, सागरी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा समाजाला अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठीचे उपक्रम आणि अध्ययन त्यांना सुरळीतपणे करता येईल. यात सागरी जीवशास्त्रातील मूलभूत, नव्या शक्यतांचा शोध घेणारे आणि प्रत्यक्ष उपयोगात येणारे संशोधन, परिसंस्था, परिसंस्थात्मवक बदल, मायक्रोबायोटा, खोलवर समुद्रातील परिसंस्था, यांच्याशी संबंधित संशोधन होऊ शकेल. या सामंजस्य करारामुळे सागरी विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील, क्षमता बांधणी, मनुष्यबळ विकास आणि कौशल्यविकास सहकार्य दृढ होण्यास मदत होईल.
* * *
Jaydevi PS/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1751079)
Visitor Counter : 196