संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

06 सप्टेंबर 2021 रोजी नौदल विमानचालनाला प्रेसिडेंट कलर देऊन गौरवण्यात येणार

Posted On: 31 AUG 2021 7:19PM by PIB Mumbai

मुंबई, 31 ऑगस्ट 2021

राष्ट्रपती राम नाथ कोविंद 6 सप्टेंबर 21 रोजी आयएनएस हंस, गोवा येथे होणाऱ्या संचलन सोहळ्यात भारतीय नौदल विमानचालनाला प्रेसिडेंट कलर देऊन गौरवतील. या प्रसंगी टपाल खात्याकडून एक लिफाफा देखील प्रकाशित केला जाईल . या सोहळ्याला गोव्याचे राज्यपाल, संरक्षण मंत्री, गोव्याचे मुख्यमंत्री, नौदलप्रमुख आणि इतर अनेक नागरी आणि लष्करी सेवेतील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. प्रेसिडेंट कलर हा लष्करी विभागाला देशासाठी उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल  दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. भारतीय सशस्त्र दलांमध्ये भारतीय नौदल हे पहिले होते ज्यांना 27 मे  1951 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी प्रेसिडेंट कलर प्रदान केले होते. त्यानंतर नौदलात प्रेसिडेंट कलर  प्राप्त करणाऱ्यांमध्ये सदर्न नेव्हल  कमांड, ईस्टर्न नेव्हल कमांड, वेस्टर्न नेव्हल कमांड, ईस्टर्न फ्लीट, वेस्टर्न फ्लीट, सबमरीन आर्म, आयएनएस शिवाजी आणि भारतीय नौदल अकादमी यांचा समावेश आहे.

13 जानेवारी 1951 ला पहिले सीलँड विमान खरेदी करून आणि 11 मे  1953 रोजी आयएनएस गरुड, हा पहिला नौदल हवाई तळ सुरू करून भारतीय नौदल विमानचालन अस्तित्वात आले. 1958  मध्ये सशस्त्र फायरफ्लाय विमानाच्या आगमनाने आक्रमकता वाढली आणि नौदल एव्हिएशनने सातत्याने आपल्या ताफ्याचा  विस्तार केला ज्यामुळे तो  नौदलाचा अविभाज्य भाग बनला.1959 मध्ये 10 सीलँड, 10 फायरफ्लाय आणि तीन HT-2 विमानांसह इंडियन नेव्हल एअर स्क्वाड्रन (आयएनएएस)  550  चे काम सुरू झाले. त्यानंतरच्या काळात  रोटरी विंग प्लॅटफॉर्मची   विविधता देखील जोडली गेली, ज्यात अलोट , S-55, सीकिंग  42A आणि 42B; कामोव 25, 28 आणि 31; यूएच 3 एच; प्रगत लाइट हेलिकॉप्टर आणि MH60R यांचा समावेश होता. भारतीय हवाई दलाकडून 1976 मध्ये सुपर-कन्स्टलेशन , 1977 मध्ये IL-38 आणि 1989 मध्ये TU 142 M च्या समावेशासह सागरी टेहळणी  देखील हळूहळू वाढली. 1991 मध्ये डॉर्नियर 228 आणि 2013 मध्ये बोईंग पी 8I विमानाने आधुनिक उच्च कार्यक्षमता असलेल्या एमआर विमानांचा  प्रवेश झाला.

1957 मध्ये आयएनएस विक्रांत, पहिले विमानवाहू जहाज आणि नंतर अविभाज्य सी हॉक आणि अलिझ स्क्वाड्रन यांच्या समावेशासह जगाने भारतीय नौदल विमानवहनाची दखल घेतली.  आयएनएस विक्रांतने 1961 मध्ये गोव्याच्या मुक्तीमध्ये आणि 1971 च्या भारत-पाक युद्धात महत्वाची भूमिका बजावली, ज्यात  पूर्व समुद्रातली  त्याची उपस्थिती निर्णायक ठरली. 1980  च्या दशकाच्या मध्यावर सी हॅरियर्ससह आयएनएस विराटच्या समावेशामुळे नौदलाच्या कॅरियर ऑपरेशन्सला बळकटी मिळाली, जे गेल्या दशकात बलाढ्य आयएनएस विक्रमादित्यवर मिग  29K च्या आगमनाने सामर्थ्यात परिवर्तित झाले.  भारतीय नौदलाच्या वाहक क्षमतेला या महिन्यात सुरू होणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू नौका, आयएनएस विक्रांतच्या नव्या आवृत्तीमुळे आणखी धार आली आहे.

आज, भारतीय नौदल विमानचालनची   भारतीय किनारपट्टीवर आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर नऊ हवाई केंद्रे आणि तीन नौदल एअर एन्क्लेव्ह आहेत.  गेल्या सात दशकांमध्ये, हे आधुनिक, तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि अत्यंत सामर्थ्यवान शक्तीमध्ये बदलले आहे ज्यात 250 हून अधिक विमानांचा समावेश आहे ज्यात कॅरिअर बोर्न फायटर्स सागरी टेहळणी विमान, हेलिकॉप्टर आणि रिमोटली पायलटेड  विमान (आरपीए) आहेत. हवाई दलाचा ताफा  तीनही प्रकारात नौदल परिचालनाला मदत पुरवू  शकते आणि हिंद महासागर क्षेत्रातील सागरी देखरेख आणि एचएडीआरसाठी पहिला  प्रतिसाद देणारा असेल.  ऑपरेशन कॅक्ट्स, ऑप. ज्युपिटर, ऑप शिल्ड, ऑप विजय आणि ऑप पराक्रम सारख्या मोहिमांमधून  नेव्हल एव्हिएशनने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.  त्याने भारतीय नौदलाच्या वतीने एचएडीआर ऑपरेशन्सचे नेतृत्व केले आहे, आपल्या देशवासियांव्यतिरिक्त असंख्य आयओआर देशांना दिलासा दिला आहे, 2004 मध्ये ऑप कॅस्टर2006 मध्ये ऑप सुकून 2017 मध्ये ऑप सहाय्यम , 2018 मध्ये ऑप मदद , 2019 मध्ये ऑप सहायता  आणि 2019 अलीकडेच मे 21 मध्ये तौक्ते  चक्रीवादळाच्या दरम्यान मुंबई किनाऱ्याजवळ केलेले बचाव  कार्य ही काही उदाहरणे आहेत.

महिलांना नौदलाच्या लढाऊ विभागात सामील करण्यात आणि त्यांना पुरुष सहकाऱ्यांसोबत एकत्रितपणे  काम करण्याची संधी  देण्यात नेव्हल एव्हिएशन आघाडीवर आहे. नेव्हल एव्हिएटर्सला एवढ्या वर्षांमध्ये  एक महावीर चक्र, सहा वीर चक्र, एक कीर्ती चक्र, सात शौर्य चक्र, एक युध्द सेवा पदक आणि मोठ्या संख्येने नौसेना पदके (शौर्य) देऊन गौरवण्यात आले आहे. प्रेसिडेंट कलर सन्मान हा उच्च व्यावसायिक दर्जा आणि नेव्हल एव्हिएशनच्या उत्कृष्ट कामगिरीची साक्ष आहे, ज्याने देशाच्या सेवेत स्वतःचे अस्तित्व निर्माण केले  आहे.

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1750837) Visitor Counter : 138


Read this release in: English