संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वर्णिम विजय वर्षानिमित्त आयोजित समारोहांचा भाग म्हणून सैन्यदलांकडून सायक्लोथॉनचे आयोजन

Posted On: 30 AUG 2021 4:40PM by PIB Mumbai

मुंबई, 30 ऑगस्‍ट 2021

 

स्वर्णिम विजय वर्षानिमित्त भारतीय सैन्यदलांनी काल म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी मुंबईत, सायक्लोथॉनचे आयोजन केले होते. 1971 च्या भारत-पाक युद्धात, भारताच्या रोमहर्षक विजयाच्या सुवर्ण महोत्सवी स्मृतिप्रीत्यर्थ,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत एक विजयी ज्योत पेटवली होती. ही ज्योत येत्या एक सप्टेंबर 2021 रोजी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथे पोचणार आहे. ही ज्योत मुंबईत पोचण्याआधीच्या उपक्रमाअंतर्गत, सुरु असलेल्या विविध उपक्रमांच्या मालिकेतील, सायक्लोथॉन हा दूसरा उपक्रम आहे.

एअर व्हाईस मार्शल एस आर सिंग VM VSM यांनी कुलाब्यातील आर सी चर्च पासून या सायक्लोथॉनला हिरवा झेंडा दाखवला. या सर्व सायकलस्वारांसाठी, नरीमन पॉइंट, गेटवे ऑफ इंडिया आणि एशियाटिक लायब्ररी समोरुन जाणारा, 16 किलोमीटरचा मार्ग निश्चित करण्यात आला होता. कॉटन ग्रीन परिसरातील हवाई दलाच्या कार्यालयासमोर, या सायक्लोथॉनची सांगता झाली.

60 पेक्षा अधिक सायकलस्वार या सायक्लोथॉन मध्ये सहभागी झाले होते, त्यानंतर 1971 च्या युद्धात सहभागी झालेल्या ज्येष्ठ सैनिकांचा सत्कारही करण्यात आला. या उपक्रमामुळे सर्व सहभागी जवानांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत झाली. सायक्लोथॉनमधील उत्साहात ही भावना स्पष्टपणे जाणवत होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 डिसेंबर 2020 रोजी, विजयी ज्योत प्रज्वलित करुन स्वर्णिम विजय वर्ष समारंभाची सुरुवात केली होती. वीर हुतात्मा सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून ही विजयी ज्योत प्रज्वलित करण्यात आली होती. तेव्हापासून, ही विजयी ज्योत देशाच्या विविध कानाकोपऱ्यात जात असून, तिच्या या विजययात्रेदरम्यान विविध उपक्रम राबवले जात आहेत.

* * *

Jaydevi PS/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1750463) Visitor Counter : 166


Read this release in: English