संरक्षण मंत्रालय
नौदलाच्या पश्चिम विभागाचे कमांडिंग-इन-चीफ यांच्या हस्ते वीर-पत्नी आणि निवृत्त युद्ध सैनिकांचा सत्कार
प्रविष्टि तिथि:
28 AUG 2021 7:43PM by PIB Mumbai
मुंबई, 28 ऑगस्ट 2021
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि स्वर्णिम विजय वर्षा सोहळ्याचा एक भाग म्हणून 27 ऑगस्ट 21 रोजी आयएनएस गोमंतक येथे माजी नौसैनिकांशी संवाद आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमा दरम्यान, नौदलाच्या पश्चिम विभागाचे कमांडिंग-इन-चीफ ध्वज अधिकारी व्हाइस अॅडमिरल आर हरी कुमार यांनी 1971 च्या युद्धात सहभागी निवृत्त सैनिक आणि वीर पत्नी यांचा सत्कार करण्यात आला.

उपस्थितांना संबोधित करताना अॅडमिरल म्हणाले की, निवृत्त सैनिकांनी दिलेल्या सेवेसाठी नौदल त्यांचे ऋणी असे सांगत त्यांनी माजी सैनिकांच्या कल्याणासाठी लागू केलेल्या उपाययोजना सांगितल्या.नौदलात सहभागी होण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने, माजी सैनिकांनी सेवादूत व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

* * *
Jaydevi PS/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1749988)
आगंतुक पटल : 245
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English