माहिती आणि प्रसारण मंत्रालय
क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोकडून आयोजित छायाचित्र प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापकांचा सत्कार
Posted On:
28 AUG 2021 5:27PM by PIB Mumbai
गोवा, 28 ऑगस्ट 2021
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो, गोवाने छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यानिमित्त आज मडगाव शहरातील शाळांच्या मुख्य़ाध्यापकांचा सत्कारसोहळा आयोजित करण्यात आला होता.

श्रीमती ज्योती कुमारी, आयएएस यांच्या हस्ते मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. ज्योती कुमारी यांच्या हस्ते चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषक प्रदान करण्यात आले.

रवींद्र भवन परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोच्या कलापथकाने यावेळी देशभक्तीपर कार्यक्रम सादर केले.

छायाचित्र प्रदर्शन रविवार, 29 ऑगस्ट संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 23-29 ऑगस्ट हा आठवडा युवा पिढीला स्वातंत्र्यलढ्याची माहिती करुन देण्यासाठी आयकॉनिक सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे.
* * *
S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1749930)
Visitor Counter : 182