माहिती आणि प्रसारण मंत्रालय

"भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील मुंबईचे योगदान" या विषयावर नव्वदी पार केलेल्या स्वातंत्र्यसेनानी पीआयबी वेबिनारला संबोधित करणार

Posted On: 26 AUG 2021 7:35PM by PIB Mumbai

मुंबई, 26 ऑगस्ट 2021

आझादी का अमृत महोत्सव आयकॉनिक वीकचा भाग म्हणून मुंबईच्या पत्र सूचना कार्यालयाने "भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील मुंबईचे योगदान" या विषयावर वेबिनारचे आयोजन केले आहे.

92 वर्षांच्या स्वातंत्र्य सेनानी रोहिणी गवाणकर यात सहभागी होत असून  त्यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी त्या स्वातंत्र्य चळवळीबाबत त्यांची मते आणि अनुभव कथन करतील.

इतर सहभागीमध्ये इतिहास अभ्यासक अनुराधा रानडे आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासक अरुणा पेंडसे यांचा समावेश आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा जन्म मुंबईत  1885 मध्ये झाला. बाळ गंगाधर टिळक आणि नंतर महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील नेत्यांनी काँग्रेस चळवळीचे नेतृत्व केले.

स्वदेशी चळवळीत मुंबईच्या (पूर्वाश्रमीची बॉम्बे) उद्योगपतींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि इथूनच भारत छोडो आंदोलन सुरू झाले.

वेबिनारमध्ये ऑगस्ट क्रांती मैदान, तेजपाल हॉल, मणि भवन, प्रार्थना समाज आणि चौपाटी जे मिठाच्या सत्याग्रहाशी संबंधित होते या प्रमुख स्मारके/ स्थळांबाबत आठवणी सांगितल्या जातील.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय 23 ते 29 ऑगस्ट, 2021 दरम्यान आझादी का अमृत महोत्सव आयकॉनिक वीक साजरा करत आहे

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी संपूर्ण देशातून "जन भागीदारी आणि जन आंदोलन या भावनेने सहभाग आकर्षित करण्याच्या उद्देशाने हा भव्य उत्सव सुरू केला

व्यापक लोकसंपर्क कार्यक्रम आयोजित करून नवीन भारताचा प्रवास दाखवणे आणि  प्रसिद्धी न मिळालेल्या स्वातंत्र्य सैनिकांसह प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान अधोरेखित करणे हा उद्देश आहे.  आयकॉनिक वीक भूतकाळातील स्वातंत्र्य लढ्याची मूल्ये आणि वैभव तसेच तरुण, नवीन आणि आयकॉनिक भारताच्या आकांक्षा आणि स्वप्नांचा मिलाफ  दर्शवतो.

उद्या 27 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 12 वाजता हा वेबिनार https://youtu.be/pVnITlGLAF4 येथे पाहता येईल.

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1749323) Visitor Counter : 267


Read this release in: English