दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
23 सप्टेंबर रोजी गोवा टपाल खात्याकडून डाक अदालतीचे आयोजन
Posted On:
26 AUG 2021 3:16PM by PIB Mumbai
पणजी, 26 ऑगस्ट 2021
मुख्य पोस्टमास्तर जनरल, गोवा विभाग कार्यालयाने 23 सप्टेंबर 2021 रोजी डाक अदालतीचे आयोजन केले आहे. सकाळी 11.00 वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, पणजी यांच्या कार्यालयामध्ये 49 वी डाक अदालत पार पडणार आहे.
टपालसेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवडयांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची दखल या डाक अदालत मध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तू/ मनी ऑर्डर/बचत बँक खाते /प्रमाणपत्र याबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा, जसे तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवीली असेल त्याचे नाव व हुद्दा.
संबंधितांनी टपाल सेवेबाबतची आपली तक्रार रमेश प्रभू, सहायक संचालक टपालसेवा आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, पणजी यांचे नावे दोन प्रती सह दिनांक 13.09.2021 पर्यंत अथवा त्यापूर्वी पोहचतील अशा रितीने पाठवावी, त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही.
S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1749223)
अभ्यागत कक्ष : 202