माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्षेत्रीय लोकसंपर्क कार्यालयाकडून चित्रप्रदर्शनाचे आयोजन


उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या हस्ते उद्या रवींद्र भवन, मडगाव येथे उद्घाटन

प्रविष्टि तिथि: 26 AUG 2021 1:41PM by PIB Mumbai

पणजी, 26 ऑगस्ट 2021

 

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या क्षेत्रीय लोकसंपर्क गोवा कार्यालयाकडून रवींद्र भवन, मडगाव येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, 27 ते 29 ऑगस्ट दरम्यान तीन दिवसीय चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.  

उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या हस्ते शुक्रवार  27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी गोवा मुक्तीसंग्रामात योगदान दिलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच स्थानिक कलाकारांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रवींद्र भवन प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात येणार आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी मडगाव परिसरातील शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कारसोहळा आयोजित केला आहे. तसेच ‘आझादी का अमृत महोत्सवा’निमित्त आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकं दिली जाणार आहेत.  

स्वातंत्र्यलढा आणि गोवा मुक्तीवर आधारीत चित्र प्रदर्शन 27-29 ऑगस्ट दरम्यान सकाळी 9 ते रात्री 8 सर्वांसाठी खुले आहे. 

 

* * *

S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1749189) आगंतुक पटल : 207
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English