दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
पेंशन अदालत
Posted On:
24 AUG 2021 7:59PM by PIB Mumbai
मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई द्वारे टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारकसाठी/ कुटुंब निवृत्तीवेतनधारकसाठी ४९ वी पेंशन अदालत दिनांक २८.०९.२०२१ रोजी ११.०० वाजता मुख्य पोस्टमास्टर जनरलचे कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई येथे आयोजित केली आहे.
निवृत्तीवेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत/ ज्यांची सेवेत असताना मृत्यू झालेली आहे, टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निववृत्तीधारक ज्यांचे ३ महिन्याच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक पेंशन अदालत मधे विचार केला जाईल.
कोविड-१९ महामारीच्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पेंशन अदालतला प्रत्यक्ष उपस्थित राहणे टाळावे.
पेंशन अदालत मधे पुर्णपणे कायदेशीर मुद्द्यासह प्रकरणे ई. वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेंशन, तीबीओपि/एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या प्रकरनांचा विचार करण्यात येणार नाही.
निवृत्तीवेतनधारक खाली दिलेल्या प्रपत्रामध्ये आपले अर्जाचे तिप्पट प्रती वरिष्ठ लेखा अधिकारी/ सचिव, पेंशन अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ भवन, दूसरा मजला, मुंबई -४०० ००१ ला ३१.०८.२०२१ रोजी किंवा यापूर्वी वैयक्तिक रूपाने(तक्रारींची मोठ्या प्रमाणात/इतरांच्या वतीने नाही) पाठवू शकता. ३१.०८.२०२१ च्या नंतर मिळालेल्या अर्जावर पेंशन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.
पुढे, पोस्टमास्टर जनरल नागपुर क्षेत्र नागपुर-४४००१० द्वारा दिनांक ०२.०९.२०२१ ला ११.०० वाजता, पोस्टमास्टर जनरल नागपुर यांचे कार्यालय, डाक सदन, पहिला माळा, शंकरनगर डाकघर बिल्डिंग नागपुर -४४००१० ईथे पेंशन अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. निवृत्तीवेतनधारक खाली दिलेल्या प्रपत्रामध्ये आपले अर्ज, पोस्टमास्टर जनरल नागपुर क्षेत्र नागपुर-४४००१० ळा २६.०८.२०२१ रोजी किंवा यापूर्वी पाठवू शकतात. २६.०८.२०२१ च्या नंतर मिळालेल्या अर्जावर पेंशन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.
***
D.Wankhede/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1748665)
Visitor Counter : 201