अर्थ मंत्रालय
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबईत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर अधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक
उद्योजकांशीही साधला संवाद
Posted On:
24 AUG 2021 7:01PM by PIB Mumbai
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून आज त्यांनी प्राप्तिकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि जीएसटी आणि सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या बैठका घेतल्या. महसूल सचिव तरुण बजाज, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळचे (CBDT) अध्यक्ष जे बी मोहपात्रा, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे (CBIC) अध्यक्ष उपस्थित होते.
त्यानंतर संध्याकाळी अर्थमंत्र्यांनी भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात उद्योजकांची भेट घेतली.



उद्या, सीतारामन सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांच्या प्रमुखांबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या वार्षिक कामगिरीचा आढावा घेणार आहेत.
अर्थमंत्री EASE 4.0 (वाढीव सुगम्यता आणि सेवा उत्कृष्टता) चा शुभारंभ करतील. स्वच्छ आणि स्मार्ट बँकिंगला संस्थात्मक बनवण्याच्या उद्देशासह सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी EASE हा एक सामायिक सुधारणा कार्यक्रम आहे. त्याची पहिली आवृत्ती EASE 1.0 जानेवारी 2018 मध्ये सुरु करण्यात आली होती.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1748647)
Visitor Counter : 278