दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

29 सप्टेंबर रोजी डाक अदालत

Posted On: 19 AUG 2021 10:50AM by PIB Mumbai

मुंबई, 19 ऑगस्ट 2021

मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबई  द्वारे दिनांक 29 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, मुंबई यांच्या कार्यालयामध्ये 116 वी डाक अदालत आयोजित करण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित टपालसेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवडयांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची दखल या डाक अदालत मध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तू/ मनी ऑर्डर/बचत बँक खाते /प्रमाणपत्र याबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा, जसे तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवीली असेल त्याचे नाव व हुद्दा.

संबंधितांनी टपाल सेवेबाबतची आपली तक्रार एम. शान्तला भट्ट, सहायक संचालक टपालसेवा आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, मुंबई जी. पी. ओ. इमारत, दुसरा माळा, मुंबई – 400001 यांचे नावे दोन प्रती सह दिनांक 10.09.2021 पर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी, त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही.

***

SamarjitT/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1747295) Visitor Counter : 199


Read this release in: English