दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
पोस्टल, रेल्वे डाक आणि मेल मोटर कर्मचाऱ्यांसाठी द्वितीय कोविड -19 लसीकरण शिबिराचे आयोजन मुंबई जीपीओ येथे आज मुंबई महानगर पालिका ‘अ’ वार्ड यांच्या सहकार्याने करण्यात आले
Posted On:
17 AUG 2021 8:15PM by PIB Mumbai
मुंबई, 17 ऑगस्ट 2021
श्री हरीश अग्रवाल, माननीय मुख्य पोस्टमास्टर जनरल,महाराष्ट्र सर्कल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. प्राजक्ता आंबेरकर, वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका ‘अ’ वॉर्ड, आरोग्य विभाग, श्रीमती स्वाती पांडे, पोस्टमास्टर जनरल (मुंबई क्षेत्र), सुश्री केया अरोरा, संचालक पोस्टल सेवा (मुख्यालय) आणि श्री अभिजीत बनसोडे, प्रवर अधीक्षक डाकघर, मुंबई शहर दक्षिण विभाग उपस्थित होते.
या लसीकरण शिबिरात, कोविशील्ड च्या 579 / कोवाक्सिन च्या - 40 (पहिली आणि दुसरी लस) अशा एकूण 619 लसी टपाल कर्मचाऱ्यांना दिल्या गेल्या .
MC/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1746778)
Visitor Counter : 113