संरक्षण मंत्रालय
नौदल मुख्यालय, महाराष्ट्र यांच्या वतीने 'आझादी का अमृत महोत्सव' - फ्रिडम सायक्लोथॉनचे मुंबईत आयोजन
प्रविष्टि तिथि:
14 AUG 2021 8:20PM by PIB Mumbai
मुंबई, 14 ऑगस्ट 2021
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षातल्या पदार्पणाच्या निमित्ताने नौदल मुख्यालय, महाराष्ट्राने आज सकाळी मुंबईत ‘फ्रीडम सायक्लोथॉन’ आयोजित केले होते. 75 सायकलस्वारांनी 'आझादी का अमृत महोत्सव' या निमित्त 75 किमी चे एकूण अंतर पार केले. या कार्यक्रमाचे ब्रीदवाक्य होते ‘शक्ति धैर्यमयती’- अर्थात शक्तीमधून धैर्य येते.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र नेव्हल एरिया (FOMA) चे रियर अॅडमिरल अतुल आनंद, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग यांनी झेंडा दाखवला. मुंबई शहराच्या गजबजलेल्या रस्त्यांमधून पर्यायी मार्गांद्वारे अंतर कापण्यासाठी सायकलस्वारांना प्रत्येकी 25 पुरुषांच्या तीन गटात विभागले होते. ‘भारत माता की जय’ च्या घोषणा देत सायकलस्वारांनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी भ्रमंती केली. हा कार्यक्रम भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्ष झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या मालिकेचा एक भाग होता.

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1745916)
आगंतुक पटल : 202
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English