दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
गोवा टपाल विभागाकडून ‘गोवा काजू फेणी’ विषयावर विशेष कव्हर आणि कॅन्सलेशनचे प्रकाशन
Posted On:
12 AUG 2021 5:03PM by PIB Mumbai
पणजी, 12 ऑगस्ट 2021
गोवा टपाल विभागाकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचा भाग म्हणून 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 दरम्यान गोवापेक्स 2021 या जिल्हास्तरीय आभासी फिलाटेली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनातील पहिल्या टप्प्यात आज गोवा काजू फेणीवर विशेष कव्हर आणि कॅन्सलेशनचे पोस्ट मास्तर जनरल कर्नल एस एफ एच रिझवी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. पणजी मुख्यालयात हे कव्हर विक्रीसाठी उपलब्ध आहे.
अमृत महोत्सव आणि गोवा मुक्ती हिरक महोत्सवी वर्ष यानिमित्ताने आगामी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात फिलाटेलीच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि गोव्यातील वारसास्थळे आणि संस्कृतीविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
फेणी तयार करण्याच्या प्रक्रियेवर आजचे कव्हर आधारीत आहे. आजच्या विशेष कॅन्सलेशन प्रकाशनाप्रसंगी वरिष्ट टपाल अधीक्षक डॉ सुधीर जाखेरे, गोवा फिलाटेली आणि न्यूमीस्मॅटीक सोसायटीचे अध्यक्ष डॉ रमेश कुमार यांची उपस्थिती होती.
***
S.Thakur/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1745166)
Visitor Counter : 216