वस्त्रोद्योग मंत्रालय
7 वा राष्ट्रीय हातमाग दिन मुंबईतील विणकर सेवा केंद्रात साजरा
Posted On:
07 AUG 2021 9:24PM by PIB Mumbai
7 वा राष्ट्रीय हातमाग दिन आज मुंबईतील विणकर सेवा केंद्रात साजरा करण्यात आला. देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात या क्षेत्राचे योगदान या कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आले. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या विकास आयुक्त (हातमाग) अंतर्गत कार्यरत हे विणकर सेवा केंद्र विणकाम, रंगकाम आणि डिझायनिंग सारख्या विषयांमध्ये अद्ययावत कौशल्य प्रशिक्षण देते. मुंबई केंद्राचे नाशिकमधील येवला, औरंगाबादमधील पैठण आणि सोलापूर येथे प्रभाग स्तरीय समूह आहेत जेथे कौशल्य प्रशिक्षण, हातकरघा संवर्धन सहाय्यता (एचएसएस), प्रत्येकीसाठी शेडची उभारणी आणि लाइटिंग-युनिटचे बांधकाम या केंद्रीय योजना राबवल्या जातात.
आज मुंबई केंद्रात कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये आमदार कॅप्टन तमिळ आर सेल्वम, डिझाईन सल्लागार बेला संघवी सहभागी झाल्या होते. त्यांनी केंद्रात केल्या जाणाऱ्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. काही विणकर-लाभार्थी देखील उपस्थित होते. हातमाग क्षेत्राच्या विकासासाठी प्रमुख उपक्रमांच्या अंमलबजावणीशी संबंधित ब्लॉक लेव्हल क्लस्टर, इंडिया हँडलूम ब्रँड, ई-कॉमर्स, ई-धागा, जीआय इत्यादी उपक्रमांवर चर्चा झाली. विणकर सेवा केंद्रात विकसित केलेल्या उत्पादनांची डिझाईन्स आणि नमुने प्रदर्शित करण्यात आले होते.
विणकर सेवा केंद्र मुंबईचे उपसंचालक संदीप कुमार यांनी माहिती दिली की, कौशल्य सुधारणा कार्यक्रमाच्या प्रत्येक तुकडीत 20 लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते आणि एका वर्षात 45 दिवसांची अशी 21 प्रशिक्षण सत्र आयोजित केले जातात.
या केंद्रामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या 28 विणकरांना 2 संत कबीर पुरस्कार आणि 17 राष्ट्रीय पुरस्कारांसह विविध पुरस्कार मिळाले आहेत, यावरून मुंबई केंद्राच्या यशाचा अंदाज येऊ शकतो. तसेच पाच विणकर लाभार्थीना पैठणी साडी बनवल्याबद्दल इंडिया हँडलूम ब्रँड प्रमाणपत्र मिळाले आहे आणि त्यापैकी सात जणांनी इंडिया हँडलूम ब्रँड उत्पादनांच्या किरकोळ दुकानाअंतर्गत नोंदणी केली आहे. या केंद्राने 24 विणकरांसाठी पीएम मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज देखील मिळवून दिले आहे अशी माहिती संदीप कुमार यांनी दिली.
***
S.Thakur/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1743721)
Visitor Counter : 217