संरक्षण मंत्रालय

दक्षिण कमांडच्या सुभेदार नीरज चोप्रा यांनी  टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रचला इतिहास

Posted On: 07 AUG 2021 8:45PM by PIB Mumbai

भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे सुभेदार नीरज चोप्रा यांनी आज  ऑलिम्पिक स्पर्धेत 87.58  मीटर भालाफेक करत, ट्रॅक अँड फिल्ड सुवर्णपदक जिंकत नवा इतिहास रचला आहे.नीरज चोप्रा यांनी आपले प्रशिक्षण पुण्याच्या आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट मध्ये   केले आहे.  सुभेदार नीरज मूळचे हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातल्या खांदरा गावातल्या शेतकरी कुटुंबातले आहे.   26 ऑगस्ट 2016 साली, नायब सुभेदार पदावर भारतीय लष्करात ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर म्हणून ते रुजू झाले . नीरजला 2018 साली अर्जुन पुरस्कार आणि 2021 साली त्यांच्या नेत्रदीपक कामगिरीसाठी विशिष्ट सेवा पदकाने गौरवण्यात आले आहे. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल, तसेच भारतीय लष्कर आणि संपूर्ण देशाचा गौरव वाढवल्याबद्दल,  दक्षिण कमांडचे प्रमुख, लेफ्टनंट जनरल जे.एस. नैन यांनी  अभिनंदन केले आहे.

***

M.Iyengar/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1743713) अभ्यागत कक्ष : 221
Read this releasein: English