रेल्वे मंत्रालय

रेल्वे प्रकल्पांची जलद अंमलबजावणी

प्रविष्टि तिथि: 06 AUG 2021 5:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 ऑगस्‍ट 2021

 

भारतीय रेल्वेवर दिनांक  01.04.2021 पर्यंत, 51,165 किमी लांबीचे, सुमारे  7.53 लाख कोटी रुपयांचे 484 रेल्वे प्रकल्प, योजना/मंजुरी/अंमलबजावणीच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत.  त्यापैकी 10,638 किमी लांबीचे कार्यान्वयन करण्यात आले  आणि मार्च 2021पर्यंत .2.14 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

वर्ष 2014-21 दरम्यान, 17,720 किमी लांबीचे  (3,681 किमी नवीन मार्ग , 4,871 किमी गेज रूपांतर आणि 9,168 किमी दुहेरीकरण) कार्यान्वयन सरासरी 2,531 किमी/वर्ष याप्रमाणे करण्यात आले आहे.

भारतीय रेल्वेमध्ये 2014-19 दरम्यान नवे मार्ग , गेज रूपांतर आणि दुहेरीकरणाच्या कामांसाठी सरासरी वार्षिक अर्थसंकल्पीय तरतूद वाढवून ती वर्षाला 26,026 कोटी रुपये करण्यात आली. 2009-14 दरम्यान  ती  11,527 कोटी रुपये होती. 

आर्थिक वर्ष 2021-22 साठी, आतापर्यंतची  सर्वाधिक 52,498 कोटी रुपये खर्चाची  (Rs.45,465 कोटी {अर्थसंकल्पीय अंदाज} आणि 7,033 कोटी रुपये अतिरिक्त तरतूद )अर्थसंकल्पीय तरतूद या कामांसाठी करण्यात आली.  2009-14 च्या या संदर्भातील  सरासरी वार्षिक अर्थसंकल्पीय तरतुदीच्या  ती  355% अधिक आहे..

प्रकल्पांसाठी  तर्कसंगत पद्धतीने अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे.  जे प्रकल्प पूर्ण होण्याच्या प्रगत  टप्प्यात आहेत, प्राधान्य प्रकल्प, महत्त्वाचे नवीन मार्ग  आणि राष्ट्रीय प्रकल्प, अंमलबजावणीयोग्य आणि महत्त्वपूर्ण गेज रूपांतर प्रकल्प आणि विशिष्ठ कालावधीतील प्रक्रिया करून तयार केलेल्या उत्पादनांच्या वाढीच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रकल्प यासाठी तरतूद करण्यात आली आहे. 

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना ही माहिती दिली.


* * *

Jaydevi PS/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1743285) आगंतुक पटल : 251
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English