युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

कुस्तीपटू रवी कुमार दहियाने भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली , टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलो गटात पटकावले रौप्य पदक

Posted On: 05 AUG 2021 7:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2021

ठळक वैशिष्ट्ये :

  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविकुमार दहिया याचे त्याच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे
  • रवीकुमार दहिया याचे  अभिनंदन करत क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर  म्हणाले, तुझी उत्साही कामगिरी प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे

कुस्तीपटू रवीकुमार दहिया याने आज टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलोच्या अंतिम फेरीत रशियाचा  दोन वेळचा विश्वविजेता झौर उगुएवकडून  4-7 ने पराभूत होत   रौप्य पदक जिंकले. कुस्तीपटू सुशील कुमार नंतर कुस्तीमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकणारा हा 23 वर्षीय  रवीकुमार दुसरा पुरुष कुस्तीपटू ठरला. मीराबाई चानू, पी.व्ही. सिंधू, लवलिना बोर्गोहेन आणि पुरुष हॉकी संघाने पदके  मिळवल्यानंतर हे भारताचे पाचवे पदक आहे.  राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान  नरेंद्र मोदी, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि देशभरातील लोकांनी रौप्य पदक विजेता कुस्तीपटू रवी कुमार दहिया याचे अभिनंदन केले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कुस्तीपटू रवी कुमार दहियाचे  टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले.  कोविंद यांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे , टोक्यो 2020 मध्ये कुस्तीत  रौप्य पदक जिंकणाऱ्या रवी दहियाचा भारताला  अभिमान आहे. तू  खूप कठीण परिस्थितीतून परत आलास  आणि जिंकून दाखवलेस.  खऱ्या चॅम्पियन प्रमाणे, तू तुझी  आंतरिक शक्तीचे  देखील दर्शन घडवलेस.  अनुकरणीय विजयाबद्दल आणि भारताला गौरव मिळवून दिल्याबद्दल अभिनंदन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुस्तीपटू रवी कुमार याचे अभिनंदन केले आणि ट्विट केले, "रवी कुमार दहिया एक उत्तम  कुस्तीपटू आहे ! त्याची लढण्याची जिद्द  आणि चिकाटी उल्लेखनीय  आहे. टोक्यो 2020 मध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. भारताला त्याच्या कामगिरीचा खूप अभिमान आहे."

क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटू रवी कुमार दहियाचे अभिनंदन केले आणि ट्विट केले, भारत जिंकला ! तू हे करून दाखवलेस  रवी ! अभिनंदन ! तुझी  उत्साहवर्धक  कामगिरी ही प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे ! किती अविश्वसनीय प्रवास! भारतीय क्रीडा जगतासाठी किती आश्चर्यकारक दिवस आहे !

रवी कुमार दहिया हा मूळचा हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील नहरी गावचा आहे. तो एका शेतकरी कुटुंबातून आला आहे आणि त्याचे वडील त्याच्या गावातील भातशेतीमध्ये काम करायचे. त्याने वयाच्या 10 व्या वर्षी कुस्ती खेळायला सुरुवात केली. 2017 मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान त्याला गुडघ्याला दुखापत झाली. यामुळे त्याला कोणतेही प्रायोजक नव्हते आणि दुखापतीपासून बरे होण्यासाठी त्याला त्याच्या हितचिंतकांवर अवलंबून रहावे लागले.

वैयक्तिक माहिती:

जन्मतारीख: 12 डिसेंबर 1997

निवास  स्थान: निहारी, सोनीपत, हरियाणा

खेळ: कुस्ती

प्रशिक्षण तळ: SAI NRC सोनीपत/ छत्रसाल स्टेडियम

वैयक्तिक प्रशिक्षक: कमल मलिकोव

राष्ट्रीय प्रशिक्षक: जगमंदर सिंह

कामगिरी:

  • जागतिक अजिंक्यपद - कांस्य
  • आशियाई अजिंक्यपद  - 2 सुवर्ण
  • अंडर -23 जागतिक अजिंक्यपद - 1 रौप्य पदक
  • जागतिक कनिष्ठ  अजिंक्यपद स्पर्धा - रौप्य
  • आशियाई कनिष्ठ अजिंक्यपद  - सुवर्ण

प्रमुख सरकारी उपाययोजना

  • राष्ट्रीय शिबिरांमध्ये वैयक्तिक सहाय्यक कर्मचाऱ्यांचा समावेश
  • एसीटीसी द्वारे 2018 ते 2021 दरम्यान आशियाई अजिंक्यपद , वरिष्ठ जागतिक अजिंक्यपद , मॅटेओ पेलीकोन  रँकिंग स्पर्धा, यासर डोगू आणि विश्वचषक स्पर्धेत  सहभाग
  • ऑलिम्पिक 2020 च्या तयारीसाठी वैयक्तिक सहाय्यक कर्मचाऱ्यांसह रशियामध्ये प्रशिक्षण शिबिर
  • पोलंड ओपन 2020 मध्ये सहभागासाठी व्हिसा मदत

निधी

TOPS

ACTC

TOTAL

Rs. 15,17,188

Rs. 47,47,249

Rs. 62,91,437

प्रशिक्षकांचे तपशील:

ग्रासरूट लेव्हल: हंसराज

डेव्हलपमेंट लेव्हल : ललित/ महाबली सतपाल

एलिट लेव्हल : महाबली सतपाल/ जगमंदर सिंह/ कमल मलिकोव

 

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1742886) Visitor Counter : 452