PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र

Posted On: 01 AUG 2021 7:32PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली/मुंबई 1 ऑगस्ट 2021

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg

  • 47.02 Cr. Vaccine Doses administered so far under Nationwide Vaccination Drive
  • 3,08,20,521 total recoveries across the country so far
  • Recovery Rate currently at 97.36%
  • 39,258 patients recovered during last 24 hours
  • India reports 41,831 new cases in last 24 hours
  • India's Active caseload currently 4,10,952
  • Active cases constitute 1.30% of total cases
  • Weekly Positivity Rate remains below 5%, currently at 2.42%
  • Daily positivity rate at 2.34%, remains below 5%
  • Testing capacity substantially ramped up – 46.82 crore tests conducted(Total)

#Unite2FightCorona#IndiaFightsCorona

 

PRESS INFORMATION BUREAU

MINISTRY OF INFORMATION & BROADCASTING

GOVERNMENT OF INDIA

Image

Image

Image

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती

भारतात कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने काल 47 कोटींचा महत्त्वाचा टप्पा पार केला. आज सकाळी आठ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, आतापर्यंत 55,71,565 सत्रांद्वारे कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 47,02,98,596 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात लसीच्या 60,15,842 मात्रा देण्यात आल्या.

दिल्या गेलेल्या मात्रांची आकडेवारी पुढे समाविष्ट केली आहे –

 

HCWs

1st Dose

1,03,10,569

2nd Dose

78,48,198

FLWs

1st Dose

1,79,76,013

2nd Dose

1,13,28,258

Age Group 18-44 years

1st Dose

15,61,40,811

2nd Dose

86,68,370

Age Group 45-59 years

1st Dose

10,63,39,854

2nd Dose

3,91,28,126

Over 60 years

1st Dose

7,60,38,913

2nd Dose

3,65,19,484

Total

47,02,98,596

 

कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाचा नवीन टप्प्याला देशामध्ये 21 जून 2021 पासून प्रारंभ झाला. संपूर्ण देशभरात लसीकरण मोहिमेचा वेग वाढविणे आणि त्याची व्याप्ती विस्तारित करणे यासाठी केंद्रसरकार कटिबद्ध आहे.

देशात महामारीच्या प्रारंभीपासून कोविडमुळे बाधित झालेल्यांपैकी 3,08,20,521 व्यक्ती यापूर्वीच कोविड – 19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहेत. आणि गेल्या 24 तासात 39,258 रुग्ण कोविडमधून बरे झाले. यामुळे एकूण रोगमुक्ती दर आता 97.36 % इतका झाला आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001SB1P.jpg

गेल्या 24 तासात भारतात 41,831 दैनंदिन नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

रोज नोंद होत असलेल्या नवीन कोविड बाधित रुग्णांची संख्या गेले सलग 35 दिवस 50,000 पेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या अखंडित आणि संयुक्तपणे करण्यात आलेल्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002AGHS.jpg

भारतातील सक्रीय रुग्णसंख्या आज 4,10,952 इतकी आहे आणि देशातील सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 1.30 % इतके आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003LKXD.jpg

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्यांची क्षमता लक्षणीय प्रमाणात वाढविण्यात आली असून गेल्या 24 तासात देशात एकूण 17,89,472 चाचण्या करण्यात आल्या. संसर्गाच्या अगदी सुरवातीपासून आतापर्यंत देशात 46.82 कोटींहून अधिक (46,82,16,510) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात एका बाजूला चाचण्यांची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.42 % आहे तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर आज 2.34 % इतका आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सलग 55 दिवस 5% पेक्षा कमी राहिला आहे

 

इतर अपडेटस्

  • देशव्यापी लसीकरण मोहिमेचा भाग म्हणून केंद्र सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांचा पुरवठा मोफत करीत आहे. कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या सार्वत्रिकीकरणाच्या नव्या टप्प्यात केंद्र सरकार, देशातील लस उत्पादकांकडून उत्पादित केलेल्या 75 % लसी खरेदी करून त्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरविणार आहे. सर्व स्रोतांच्या माध्यमातून आतापर्यंत 49.49 कोटींपेक्षा अधिक (49,49,89,550) लसीच्या मात्रा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना पुरविण्यात आल्या आहेत आणि आणखी 8,04,220 मात्रा पुरविल्या जाणार आहेत. आज सकाळी आठ वाजेपर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, यापैकी वाया गेलेल्या मात्रांसह एकूण 46,70,26,662 लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. याखेरीज राज्ये / केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे लसीच्या 3 कोटींपेक्षा जास्त (3,00,58,190) शिल्लक आणि न वापरलेल्या मात्रा शिल्लक आहेत.

Important Tweets

***

S.Thakur/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1741314) Visitor Counter : 116


Read this release in: English , Hindi , Punjabi , Gujarati