माहिती आणि प्रसारण मंत्रालय
फिल्म्स डिव्हिजनच्यावतीने शहीद उधमसिंग यांना आदरांजली
Posted On:
31 JUL 2021 5:30PM by PIB Mumbai
मुंबई, 31 जुलै 2021
महान देशभक्त क्रांतीकारक शहीद उधमसिंग यांच्या 31 July 2021 रोजी असणाऱ्या 81 व्या पुण्यतिथीला त्यांना आदरांजली म्हणून फिल्म्स डिव्हिजन शहीद उधमसिंग यांच्यावरील जीवनचरित्रपट प्रदर्शित करत आहे. भारत@75 सोहळ्याचा मुकुटमणी असलेल्या ‘आझादी का अमृतमहोत्सव’ चा भाग म्हणून या चरित्रपटाचा विशेष खेळ आयोजित करण्य़ात आला आहे.
हा जीवनचरित्रपट स्वातंत्र्याची आस आणि निर्धार यांचे अनोखे मिश्रण असलेल्या शहीद-ए-आझम शहीद उधम सिंग यांचे जीवन आणि धेय्य यांची कहाणी सांगतो. https://filmsdivision.org/ मधील ‘Documentary of the Week’ या भागामध्ये तसेच https://www.youtube.com/user/FilmsDivision या लिंकवर 24 तासांकरीता राहील उपलब्ध .
* * *
Jaydevi PS/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1741056)
Visitor Counter : 141