कृषी मंत्रालय
उत्तर गोव्यातील शेतकऱ्यांसाठी KVK, ICAR-CCARI मध्ये जिल्हा कृषीमान केंद्र (DAMU) हे हवामानाधारीत कृषी सल्ला केंद्र
Posted On:
26 JUL 2021 11:05PM by PIB Mumbai
वातावरण आणि हवामानासंबंधीची माहिती कृषी उद्योगात आणि कृषी व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावते. तालुका पातळीवरील शेतकरी समुदायाला शेती विषयक सुविधांची असलेली गरज लक्षात घेऊन भारतीय हवामान विभागाने(IMD), ICAR च्या सहकार्याने ग्रामीण कृषि मौसम सेवा (GKMS) या योजनेअंतर्गत जिल्हा पातळीवरील जिल्हा कृषीमान केंद्र उभारले आहे. KVK, ICAR-CCARI, जुने गोवा येथे हे केंद्र आहे.
पूर्वीच्या, आत्ताच्या आणि भविष्यातील हवामान बदलाला अनुसरून पिकांसंबंधीचे निर्णय घेण्यासाठी ही कृषी सल्लागार सेवा सहकार्य करते. यामध्ये पिकांसंबंधी, कीडनियंत्रण, रोगव्यवस्थापन, पाणी आणि मृदा संरक्षण, बियाणे आणि खते व्यवस्थापन, किटक नियंत्रण, किड नियंत्रण आणि तणनाशक औषधांची फवारणी, इत्यादी गोष्टीं संबंधीचा सल्ला या सेवेत अंतर्भूत आहे.
याशिवाय पेरणी, लावणी यासारखे हवामानासंबधी संवेदनशील असणाऱ्या प्रक्रिया ,किडनाशक तणनाशक आणि खतांचा वापर, पाण्याचे प्रमाण व वेळ ठरवणे, मोसमानुसार पिके घेणे, पशूंच्या आजाराबद्दल पूर्वसूचना, पशुधनाचे व पोल्ट्रीमधील पक्षांचे लसीकरण या बाबतीत ते शेतकऱ्याला सहाय्य करते.
जिल्हास्तरीय कृषीमान केंद्र (DAMU) हे उत्तर गोव्यातील जिल्ह्यांमध्ये कृषी विज्ञान केंद्र (KVK), ICAR-CCARI, जुने गोवा येथे असून ते उत्तर गोव्यातील बार्डेज, बिचोलीम, पर्णीम, सत्तारी व तिसवडी या 5 तालुक्यांसाठी आहे. हवामान परिस्थिती व हवामानविषयक अंदाज हे मुंबईचे स्थानिक हवामानशास्त्र केंद्र व गोवा येथील हवामानशास्त्र केंद्र येथून प्राप्त होतात. या माहितीवर आधारीत कृषी सल्ला वार्तापत्र तयार होऊन ते प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी शेतकऱ्यांना दिले जाते. ही वार्तापत्रे कोकणी व इंग्लीश भाषेत असतात. तेच वार्तापत्र 130 गावांमधील शेतकऱ्यांपर्यंत पोचावे म्हणून ग्रामनिहाय वॉट्सअप गट तयार केले आहेत. याद्वारे जवळपास 6000 शेतकऱ्यांना हवामानविषयक माहिती व कृषीमान सल्ला वार्तापत्र मिळते. ही कृषीमान सल्ला वार्तापत्रे https://ccari.icar.gov.in , https://kvknorthgoa.icar.gov.in , https://ahvs.goa.gov.in, http://fisheries.goa.gov.in, http://www.imdgoa.gov.in या संकेतस्थळांवरही उपलब्ध होतात. भविष्यात यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल.
***
M.Chopade/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1739286)
Visitor Counter : 238