संरक्षण मंत्रालय
कारगिल विजय दिवसानिमित्त मुंबईतील शहीद स्मारक, येथे वीर जवानांना श्रद्धांजली
Posted On:
26 JUL 2021 6:35PM by PIB Mumbai
26 जुलै 2021 रोजी 22 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त, भारतीय सशस्त्र दलाच्या विजयाच्या स्मरणार्थ आणि हुतात्म्यांच्या सर्वोच्च बलिदानास आदरांजली म्हणून मुंबईच्या कुलाबा येथील शहीद स्मारकात पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. या समारंभात पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल आर हरि कुमार, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, महाराष्ट्र गुजरात व गोवा विभागाचे कमांडिंग जनरल ऑफिसर लेफ्टनंट जनरल एस के प्रशर, एव्हीएसएम, व्हीएसएम, , तसेच रीअर अॅडमिरल अतुल आनंद व्हीएसएम, महाराष्ट्र नौदल विभागाचे कमांडिंग फ्लॅग ऑफिसर आणि ग्रुप कॅप्टन जितेंद्र दिनकर मसुरकर, व्हीएम कार्यवाहक एअर ऑफिसर कमांडिंग, हेडक्वार्टर मेरीटाइम एअर ऑपरेशन्स आणि तिन्ही सेवेतील अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण केले.
जगातील सर्वात प्रतिकूल प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लडाखच्या कारगिल-द्रास क्षेत्रातील शौर्य आणि पराक्रमाची गाथा म्हणून दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. या दिवशी भारतीय सशस्त्र सैन्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत खराब हवामानात बर्फाच्छादित शिखरांच्या तीव्र उतारावर चिकाटी आणि शौर्याने शत्रूचे मनसुबे उधळून लावले आणि घुसखोरांना भारत भूमीतून हद्दपार केले. सुमारे 16,000 फूट उंचीवर हे युद्ध झाले.
सर्व कोविड -19 च्या सुरक्षा खबरदारीचे आणि मार्गदर्शक तत्वांचे अनुसरण करून तिन्ही सेना दलातील मर्यादित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समारंभ पार पडला.
***
M.Iyengar/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1739177)
Visitor Counter : 222