दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने,भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या सेवेसाठी म्हणजे यूआयडीएआयसाठी "आधार" मध्ये  मोबाइल नंबर अद्ययावत करण्याची सेवा देण्यास केला आरंभ


आता कोणताही रहिवासी त्याच्या घराच्या पत्त्यावर  पोस्टमनद्वारे आपला मोबाइल नंबर आधारमध्ये अद्ययावत करू शकेल

Posted On: 23 JUL 2021 10:20PM by PIB Mumbai

 

इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेने (आयपीपीबी) आज जाहीर केले, की त्यांनी भारतीय विशिष्ट ओळखपत्र सेवा (यूआयडीएआय) यात पंजीकरण करण्यासाठी  आधारकार्डावर मोबाइल नंबर अद्ययावत करण्यासाठी एक सेवा सुरू केली आहे.

आता रहिवासी आधारधारक त्याच्या घराच्या पत्त्यावर पोस्टमनद्वारे आपला मोबाइल नंबर आधारमध्ये अद्ययावत करू शकतो. ही सुविधा 650 आयपीपीबी शाखा आणि 146,000 पोस्टमन तसेच स्मार्टफोन आणि बायोमेट्रिक उपकरणांनी युक्त ग्रामीण डाक सेवकांच्या विस्तृत नेटवर्कद्वारे उपलब्ध होईल.

मोबाइल नंबर अपडेट सुविधा,ही  यूआयडीएआय द्वारा विकसित 'चाइल्ड एनरोलमेंट लाइट क्लायंट (सीईएलसी)' या अनुप्रयोगाचा एक भाग आहे. सीईएलसी सेवांतर्गत नागरिक आपला मोबाईल क्रमांक त्याला जोडून / अद्ययावत करु शकतात आणि आधार जारी करण्यासाठी 5 वर्षाखालील मुलांची  देखील आधार नोंदणी करू शकतात. सध्या, आयपीपीबी केवळ मोबाइल अद्ययावत सेवा प्रदान करीत आहे आणि लवकरच आपल्या नेटवर्कद्वारे मुलाची नावनोंदणी सेवा देखील सक्षम करेल.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) ही भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाच्या 100% मालकीसह टपाल विभाग, अंतर्गत स्थापन केली गेलेली बँक आहे.

आयपीपीबीचे  मूलभूत ध्येय म्हणजे विनासायास  आणि भौगोलिक अडथळे दूर करत 155,000 टपाल कार्यालये (ग्रामीण भागात 135,000 तसेच   300,000 लाख टपाल कर्मचाऱ्यांसह  शेवटच्या रहिवाशी टप्प्यापर्यंत पोहोचणे.

***

M.Chopade/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1738369) Visitor Counter : 926


Read this release in: English