जलशक्ती मंत्रालय

वर्षा जल संचय प्रकल्प

Posted On: 22 JUL 2021 4:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जुलै 2021

जल शक्ती अभियानाच्या 2019 मधल्या यशस्वी अंमलबजावणीनंतर जल शक्ती मंत्रालयाने, देशातल्या सर्व जिल्ह्यामधल्या सर्व भागात  जल शक्ती अभियानाचा दुसरा टप्पा हाती घेण्याचे ठरवले मात्र कोविड-19 महामारीच्या निर्बंधामुळे ते शक्य झाले नाही. मात्र यामध्ये सातत्य राखण्यासाठी जल शक्ती मंत्रालयाने ‘कॅच द रेन’ अर्थात वर्ष जलसंचय मोहीम सुरु केली. ‘पावसाच्या पाण्याचा जल संचय करा, जिथे पाऊस पडेल तिथे,जेव्हा पाऊस पडेल तेव्हा’ हे या मोहीमेचे सूत्र आहे.

यावर्षी जल शक्ती मंत्रालयाने 22 मार्च 2021 ते  30 नोव्हेंबर 2021 या मान्सून पूर्व आणि मान्सून काळात देशभरात हे अभियान हाती घेतले आहे अशी माहिती जल शक्ती आणि आदिवासी विकास राज्य मंत्री बिश्वेश्वर टूडू यांनी   आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक जल दिनी 22 मार्च 2021 ला जल शक्ती अभियान; कॅच द रेन’ अभियानाचा प्रारंभ केला. 2019 च्या जल शक्ती अभियान जारी राखत ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

जुन्या रेन वॉटर हार्वेस्टिंग संरचनांची देखभाल आणि नव्यांची निर्मिती,विहिरीसारख्या पारंपरिक जल संचय साधनांचे पुनरुज्जीवन, बोरवेलचे पुनर्भरण आणि पुनर्वापर,व्यापक वनीकरण,जल शक्ती केंद्रांची उभारणी या बाबींचा या मोहिमेत समावेश आहे. संबंधित योजनांच्या अंतर्गत राज्य सरकारांना निधी जारी करण्यात येत आहे.

जल शक्ती अभियान; कॅच द रेन’ अभियानाअंतर्गत 22.3.2021 ते  12.7.2021 या काळात हाती घेण्यात आलेल्या आणि jsactr.mowr.gov.in या पोर्टल वर, केंद्रीय मंत्रालये/ विभाग यांनी महत्वाच्या कामगिरी निर्देशांका संदर्भात  अपलोड केलेल्या कामांची  सद्य स्थिती याप्रमाणे आहे-

S.No.

Parameter/activity

Number of works completed

1.

Water conservation and rain water harvesting

4,05,293

2.

Renovation of traditional water bodies

70,445

3.

Reuse and recharge structures

1,78,998

4.

Watershed development

4,32,549

5.

Intensive afforestation

25,05,000

6.

Training/awareness programmes by KVK

5,465

7.

Enumeration of water bodies

13,79,452

Jaydevi PS/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1737734) Visitor Counter : 211


Read this release in: English