परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
कलाकारांची कमाई सुरू व्हावी या साठी आय. सी. सी. आर. चे ' कला विश्व' !
Posted On:
16 JUL 2021 5:56PM by PIB Mumbai
मुंबई, 16 जुलै 2021
भारतीय सांस्कृतिक सम्बन्ध परिषद किंवा आय. सी. सी. आर. या संस्थेचे काम मुख्यतः परदेशात भारतीय संस्कृतिची ओळख करून देण्याचे भारतात शिक्षणासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनाही भारतीय संस्कृती नीट समजून घेता यावी या साठीही आय. सी. सी. आर. प्रयत्न करीत असते. भारतातीलच परदेशी विद्यार्थ्यांसाठीच्या मासिक सांस्कृतिक कार्यक्रमांबाबतच्या तरतूदीचा लाभ घेऊन आता भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद महाराष्ट्रासह देशांतील अनेक राज्यांमधून भटक्या विमुक्त समाजासह अन्य उपेक्षित वर्गांमधील विखुरलेल्या कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. कला विश्व या नावाने सुरू होत असलेल्या या कार्यक्रम मालिकेचे उद्घाटन परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत रविवारी बी. के. सी. परिसरातील विदेश भवनात होत आहे. कणकवलीला राहणारे आणि 'दशावतार' हा पारंपरिक कला प्रकार सादर करणारे ओमप्रकाश चव्हाण यांच्या कार्यक्रमाने या नव्या उपक्रमाची सुरूवात होत आहे. रविवार दि. 18 रोजी दुपारी हा कार्यक्रम प्रत्यक्ष आणि व्हर्च्यूअल अशा संमिश्र माध्यमातून सादर केला जाणार आहे.

आय. सी. सी. आर. च्या पुणे केंद्रातर्फे याच मालिके अंतर्गत पारंपारिक भारूड सादर करणारे कलाकार लक्ष्मण महाराज राजगुरू तसेच 'वाघ्या मुरळी कलावंत श्रीकांत शिवाजी रेणके यांची प्रस्तुतिकरणे होणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रम मालिकेचा उद्देश विदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती बद्दलची जाण विकसित करण्याचा असल्याने प्रत्येक कार्यक्रमाचे इंग्रजी समालोचनही त्या सोबत असणार आहे. या कार्यक्रमांचा आय. सी. सी. आर. च्या विभिन्न प्रादेशिक केंद्रांच्या फेसबुक पेज वरून रसिकांना आस्वाद घेता येईल!
MC/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1736214)
Visitor Counter : 200