संरक्षण मंत्रालय
डीआयएटीकडून ब्रिटनमधील सहा विद्यापीठांबरोबर संयुक्त कार्यशाळेचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
15 JUL 2021 2:46PM by PIB Mumbai
पुणे, 15 जुलै 2021
पुण्यातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी (डी आय ए टी) ने ब्रिटनच्या सहा विद्यापीठांसोबत 14 जुलै 2021 रोजी एक आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली होती. परस्पर सहकार्यातून या क्षेत्रात होऊ शकणाऱ्या भविष्यातील संशोधन प्रकल्पांचा या कार्यशाळेत मागोवा घेण्यात आला.

यावेळी, अत्याधुनिक साहित्य आणि उत्पादन, भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता , रडार आणि संपर्क व्यवस्था, क्वांटम तंत्रज्ञान आणि नैनो तंत्रज्ञान तसेच सेन्सर्स अशा विविध विषयांमध्ये संशोधन करण्याबाबत परामर्श घेण्यात आला.
या कार्यशाळेमुळे दोन्ही देशांमधील विद्यार्थी तसेच प्राध्यापकांना, एकत्र संशोधन तसेच प्रकल्प करण्यासाठी विचार आणि कल्पनांचे आदानप्रदान करण्याची संधी मिळाली, पुढेही ही देवघेव अशीच सुरु राहू शकेल. डीआयएटी तर्फे तज्ञ व्याख्यात्यांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला.

M.Iyengar/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1735835)
आगंतुक पटल : 213
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English