सांस्कृतिक मंत्रालय
नेहरू विज्ञान केंद्रात 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन
Posted On:
10 JUL 2021 9:50PM by PIB Mumbai
मुंबई, 10 जुलै 2021
11 जुलै रोजी ‘जागतिक लोकसंख्या दिन’ जगभरात साजरा केला जातो. लोकसंख्येच्या प्रश्नांची निकड आणि महत्त्व यावर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने, नेहरू विज्ञान केंद्राने कोविड 19 मधील सेरो सर्वेक्षणांचे महत्त्व’ आणि 'वाढत्या लोकसंख्येमुळे आपली संसाधने आणि पर्यावरणावर कशाप्रकारे ताण आहे' या विषयांवर व्याख्यान आयोजित केले आहे. 11 जुलै रोजी सकाळी आणि दुपारी ही दोन व्याख्याने आयोजित केली आहेत.

व्याख्यान 1:
व्याख्याते - डॉ. जयंती एस. शास्त्री, प्राध्यापक आणि प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, टी. एन. वैद्यकीय महाविद्यालय आणि बी. वाय. एल नायर रुग्णालय , मुंबई
दिनांक - 11 जुलै, 2021
वेळ - सकाळी 11.00 वाजता
https://www.facebook.com/nehrusciencecentre वर थेट सहभागी व्हा
व्याख्यानाबद्दल संक्षिप्त माहिती :
भारतात कोविड-19 महामारी सुरु झाल्यापासून आपण सेरो सर्वेक्षण हा शब्द वारंवार ऐकला आहे. हे सेरो सर्वेक्षण काय आहे, ते कसे केले जाते आणि लोकसंख्येमध्ये झालेला कोरोना विषाणूचा संसर्ग समजण्यासाठी ते कसे महत्वाचे आहे? लसीचे वितरण किंवा कोविड उपचार केंद्रांच्या नियोजनात ते आपल्याला कशी मदत करू शकते? या सर्वेक्षणांवर साथीचे रोग विशेषज्ञ आणि सरकार अवलंबून का आहे ? हे सामूहिक प्रतिकारशक्तीशी कसे संबंधित आहे?
व्याख्यान 2 :
व्याख्याते - डॉ. सी. एम. लक्ष्मा, प्राध्यापक, लोकसंख्या संशोधन केंद्र, सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन संस्था बंगळुरु
दिनांक - 11जुलै, 2021
वेळ - दुपारी 4.30 वाजता
https://www.facebook.com/nehrusciencecentre वर थेट सहभागी व्हा
व्याख्यानाबद्दल संक्षिप्त माहिती :
वाढती लोकसंख्या आणि चांगली जीवनशैली लोकांच्या वाढत्या संख्येसाठी अन्न, वस्त्र, निवारा, सोईसुविधा आणि करमणुकीचे सुधारित मानकांची मागणी करते
यामुळे आपली संसाधने आणि पर्यावरणावर ताण येतो आणि त्याचा ऱ्हास झाला आहे. लोकसंख्येच्या वाढीमुळे संसाधनांचा वापर, निर्माण होणारा कचरा आणि पर्यावरणीय र्हास वेगाने होत आहे. उपभोगाच्या सवयीनुसार आणि सामाजिक संस्था आणि संसाधन व्यवस्थापनाच्या विशिष्ट पद्धतीमुळे हे आणखी तीव्र झाले आहे.
जागतिक लोकसंख्या दिन
1989 मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाद्वारे जागतिक लोकसंख्या दिन सुरू करण्यात आला. जेव्हा जगाची लोकसंख्या पाच अब्जपेक्षा जास्त होती. तेव्हा 11 जुलै 1987 रोजी पाच अब्ज दिवस साजरा केला गेला
* * *
Jaydevi PS/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1734506)
Visitor Counter : 179