आयुष मंत्रालय
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आयुष रुग्णालयाच्या बांधकामावरील कामगारांसाठी ‘टीका उत्सवा’चे उद्घाटन
Posted On:
07 JUL 2021 2:20PM by PIB Mumbai
पणजी, 7 जुलै 2021
केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज धारगळ, पेडणे येथे उभारण्यात येत असलेल्या आयुष रुग्णालयाच्या बांधकामावरील कामगारांसाठी ‘टीका उत्सवा’चे उद्घाटन करण्यात आले. आरोग्य संचालनालयाने कामगारांना जाग्यावरच कोविड लस उपलब्ध करुन दिल्याबद्दल श्री नाईक यांनी राज्य सरकारचे आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने कोविड लसीकरणाला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे श्रीपाद नाईक म्हणाले. प्रत्येकाने लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी याप्रसंगी केले.

आयुष रुग्णालय प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात आगामी 8-10 महिन्याच्या काळात आयुर्वेदीक ओपीडी सुरु होणार असल्याची माहिती श्रीपाद नाईक यांनी दिली. सदरचे रुग्णालय हे दिल्ली येथे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचा विस्तारीत प्रकल्प आहे. यात 250 खाटांचे रुग्णालय ज्यात 100 खाटा आयुर्वेदासाठी आणि 150 खाटा निसर्गोपचार रुग्णांसाठी असतील. संस्थेमध्ये पदविका, पदवी आणि पी.एचडी विद्यार्थ्यांसाठी 500 जागा उपलब्ध असणार आहेत. योग विभागात मधुमेह रुग्णालय, कार्डियाक केअर युनिट असणार आहे. या संस्थेमुळे आरोग्य पर्यटनाला चालना मिळेल अशा विश्वास श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला.

* * *
S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1733334)
Visitor Counter : 73