शिक्षण मंत्रालय

अॅन्सीस संस्थेकडून आयआयटी मुंबई या शैक्षणिक संस्थेत एम.टेक.चे शिक्षण घेणाऱ्या, सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करणाऱ्या वंचित पार्श्वभूमी असलेल्या आणि महिला विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक मदत

Posted On: 30 JUN 2021 8:00PM by PIB Mumbai

मुंबई, 30 जून 2021

 

अॅन्सीस या जागतिक पातळीवरील आघाडीच्या आणि अभियांत्रिकी सिम्युलेशन सॉफ्टवेअरचा शोध लावणाऱ्या संस्थेने आज मुंबई येथील आयआयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेशी भागीदारी जाहीर केली. ही भागीदारी सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर संशोधन प्रकल्पांचे काम करणाऱ्या एम टेक च्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी आहे. शिक्षण, आरोग्यसेवा, पर्यावरणाशी संबंधित विषयांना मदत आणि तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदतीतून साकारणारे इतर सामाजिक विषयांशी संबंधित दृष्टीकोनातून समाजाशी संबंधित तंत्रज्ञानविषयक सखोल संशोधनाला वेग देण्यासाठी अॅन्सीसचा हा सामाजिक दायित्व निधीतून आकारास येणारा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. उच्च गुणवत्ता धारण करणाऱ्या पण वंचित पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना किंवा महिला विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने या शिष्यवृत्त्यांची आखणी करण्यात आली आहे.

2021-22 या शैक्षणिक वर्षापासून अॅन्सीस संस्था येणाऱ्या तीन वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी दोन वर्षांचा एम.टेक.अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा खर्च उचलेल. आयआयटी- मुंबई येथे एम.टेक. चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ होणार आहे.

या उपक्रमाविषयी बोलताना, अॅन्सीसचे भारत -दक्षिण आशिया प्रशांत महासागर क्षेत्राचे उपाध्यक्ष रफिक सोमाणी म्हणाले, “अॅन्सीस संस्थेचे आयआयटी संस्थेशी खूप वर्षांचे संबंध असून तंत्रज्ञान आणि शिक्षण यांच्या एकत्रित सामर्थ्यावर आमचा नेहमीच विश्वास ठेवला असून आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत.कोणत्याही उद्योगाचे भविष्य नि:संशयपणे तंत्रज्ञानावर अवलंबून असते आणि म्हणून संशोधन अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते. या शिष्यवृत्यांच्या रूपाने भारतातील महान बुद्धीवंताना अत्यंत आवश्यक असलेला आणि आरोग्य,शिक्षण आणि पर्यावरण यांच्यावर केंद्रीभूत असलेले संशोधन करण्यासाठी गती प्राप्त होईल अशी आशा   अॅन्सीस संस्थेतील आम्ही सर्वजण व्यक्त करीत आहोत. सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या क्षेत्रात निश्चितपणे काही अत्यंत मुलभूत पर्याय देणाऱ्या संशोधनाच्या निष्कर्षांची आम्ही उत्सुकतेने वाट पहात आहोत.”

आयआयटी मुंबई येथे कार्यरत प्राध्यापक आणि संस्थाप्रमुख, माजी विद्यार्थी आणि कॉर्पोरेट संबंध या विषयाचे प्राध्यापक डॉ.सुहास जोशी म्हणाले की, “गेल्या काही वर्षांत, विद्यार्थी परिवारात वैविध्य आणण्यासाठी आयआयटी मुंबईने गांभीर्याने प्रयत्न केले आहेत. 2019 मध्ये अॅन्सीस संस्थेने डॉक्टरेट मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सुरुवात केल्यानंतर, आता एम. टेक.चे शिक्षण घेणाऱ्या आणि वंचित पार्श्वभूमीतून आलेल्या तसेच महिला विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पुन्हा एकत्र येत असल्याबद्दल आम्हांला अत्यंत आनंद होत आहे. डॉक्टरेटच्या विद्यार्थ्यांच्या जीवनात या शिष्यवृत्त्यांमुळे जसा मोठा बदल घडून आला तसाच बदल या एम.टेक. च्या पात्र विद्यार्थ्यांमध्ये देखील घडून येईल.  अॅन्सीस संस्थेशी अधिक दृढ संबंध विकसित करण्यासाठी  आणि समाजाचे देणे अधिक जास्त आणि अधिक उत्तम प्रकारे फेडण्यासाठी यापुढेही एकत्र येऊन काम करण्यासाठी आम्ही आशावादी आहोत.”

अॅन्सीस संस्थेने 2019 मध्ये आयआयटी मुंबई मध्ये डॉक्टरेट मिळविण्यासाठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन शिष्यवृत्ती जाहीर केल्यानंतर आता अॅन्सीसने तशाच प्रकारची  संशोधन शिष्यवृत्ती एम.टेक.च्या विद्यार्थ्यांसाठी सुरु केली आहे. समाजावर उत्तम परिणाम करणाऱ्या आणि शिक्षण, आरोग्य, पर्यावरणीय शाश्वतता, स्त्रोतांचे जतन आणि तंत्रज्ञान या संबंधीच्या  संशोधनाला वेग देण्याच्या उद्देशाने महिला संशोधक आणि वंचित समाजाची पार्श्वभूमी असणारे संशोधक यांना या शिष्यवृत्त्या प्रदान करण्यात येणार आहेत. 

 

* * *

Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1731690) Visitor Counter : 118


Read this release in: English